गुन्हे विश्व

पोहोरगाव येथे अवैध वाळू उपशावर पंढरपूर तालुका पोलिसांची कारवाई

पंढरपुर तालुक्यातील पोहरगाव येथील भीमा नदीच्या पात्रातून अवैध वाळू उपसा व वाहतूक केली जात असल्याचे समजताच पंढरपुर तालुका पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यानी केलेल्या कारवाईत डम्पिंग ट्रेलर व वाळूसह ट्रॅक्टर ताब्यात घेण्यात आला असून या प्रकरणी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात 1) महेश दादाराव पाटील व 2) आकाश भारत गायकवाड दोघे रा. पोहोरगाव ,ता पंढरपुर यांच्या विरोधात भादवि 379, 34 सह गौण खनिज कायदा कलम 4(1)4(क)(1) व 21 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबत पो.हे.कॉ.सतीश चंदनशिवे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार पोहोरगाव ता पंढरपुर येथील भीमानदीचे पात्रातून काही इसम ट्रँक्टर मधुन चोरून वाळूची वाहतुक करित आहेत अशी बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक किरण अवचर यांच्या मार्गदर्शनानुसार पो.हे.कॉ.सतीश चंदनशिवे, पोना/ 1608 माळी,पोना/ 1698 आटपाडकर हे खाजगी वाहनाने मौजे पोहोरगाव ता पंढरपुर येथे गेले असता पोहोरगाव ते आंबेपावठा जाणारे रोडवर करल वस्ती जवळ दोन ट्रँक्टर एकामागे एक येत असलेले दिसले पोलीस आल्याचे पाहताच त्यातील इसम पळुन गेले.सदर ट्रँक्टर जवळ जावून पाहणी केली असता सदर ट्रँक्टरच्या पाठीमागील डंपिंग ट्रँली मध्ये वाळू असल्याचे दिसले. तेथिल आजूबाजूच्या लोकांकडे सदर ट्रँक्टचे चालकाबाबत चौकशी केली असता त्यांची नावे 1) महेश दादाराव पाटील व 2) आकाश भारत गायकवाड दोघे रा. पोहोरगाव ता. पंढरपूर असे असल्याचे निष्पन्न झाले.

या प्रकरणी महिंद्रा अर्जुन कंपनीचालाल रंगाचा 605 S माँडेल असलेला त्याचा आरटीओ नंबर MH 13 AJ 9077 व अर्जुन अल्ट्रा1 कंपनीचा 605 DI माँडेल असलेला लाल रंगाचा त्याचा आरटीओ नंबर MH 45 S 1383 हे दोन ट्रॅक्टर ताब्यात घेतले आहेत.

 

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

15 hours ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

15 hours ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

4 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago