ताज्याघडामोडी

अकरावी प्रवेशाची ‘सीईटी’ परीक्षा विद्यार्थ्यांना आजपासून ऑनलाइन अर्ज भरता येणार

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी ‘सीईटी’ चे ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्यासाठी सोमवारी (दि.26) दुपारी 3 वाजल्यापासून पुन्हा सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. ऑनलाईन पध्दतीने https://cet. 11thadmission.org.in या संकेतस्थळावरुन भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. ही सुविधा दि.2 ऑगस्ट अखेर पर्यंत उपलब्ध असणार आहे.

येत्या 21 ऑगस्ट रोजी ‘सीईटी’ परीक्षा घेण्यात येणार आहे. यासाठी 20 जुलै रोजी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली होती.मात्र हे संकेतस्थळ तांत्रिक अडचणी मुळे बंद पडले होते.

आता पुन्हा सुविधा सुरू होत आहे. राज्य मंडळाच्या संकेतस्थळावरही सीईटी पोर्टल संगणक प्रणालीमध्ये अर्ज भरण्यासाठी आवश्यक ती माहिती नोंदवावी लागणार आहे. ई-मेल आयडी , मोबाईल क्रमांक अद्ययावत करणे किंवा नव्याने नोंदविणे अनिवार्य आहे.

परीक्षेचे माध्यम, विद्यार्थ्याने सेमी इंग्रजीचा विकल्प निवडल्यास त्याला इंग्रजी, गणित व विज्ञान या विषयांच्या प्रश्नांसाठी इंग्रजी माध्यम असेल. तथापि सामाजिक शास्त्रे (इतिहास व राज्यशास्त्र, भूगोल) या विषयासाठी विद्यार्थ्यास एक माध्यम निश्चित करावे लागेल. परीक्षेसाठी विद्यार्थ्यास त्याच्या तात्पुरत्या / कायमच्या निवासस्थानाच्या पत्त्यानुसार परीक्षा केंद्र मिळण्यासाठी जिल्हा व तालुका / शहराचा विभाग निश्चित करावा लागेल.

ज्या विद्यार्थ्यांनी दहावीचे अर्ज भरताना एस एस एसईबीसी प्रवर्गाची नोंद केली आहे अशा विद्यार्थ्यांना शासनाच्या सुधारित तरतुदीनुसार खुला प्रवर्ग अथवा ईडब्लू हा प्रवर्ग निवडावा लागेल. प्रथम आवश्यक माहिती निश्चित करून ठेवावी व तद्नंतर अकरावी प्रवेशासाठी आयोजित सामाईक प्रवेश परीक्षेचे आवेदनपत्र भरण्याची कार्यवाही करावी लागणार आहे.

20 व 21 जुलै या कालावधीत ज्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून सामाईक प्रवेश परीक्षेसाठी मंडळाकडे अर्ज सादर केलेले आहेत त्यांना आपल्या अर्जाचा तपशिल पूर्वीचा अर्ज क्रमांक व आवेदनपत्र भरतांना नोंदविलेला मोबाईल क्रमांक टाकून संकेतस्थळावर पाहता येईल. प्रक्रियेदरम्यान परिपूर्ण अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकतानाही. मात्र प्रक्रिया पूर्ण करू न शकलेल्या उमेदवारांचा तपशिल संकेतस्थळावर उपलब्ध नसल्यास त्यांनी नव्याने अर्ज सादर करणे आवश्यक राहील.

सामाईक प्रवेश परीक्षेसंदर्भात विद्यार्थी, व अन्य संबंधीत घटकांच्या शंकांचे निरसन पालक करण्यासाठी मंडळामार्फत यापूर्वी हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचा तपशिल मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

राज्य मंडळाची दहावीची परीक्षा सन 2021 पूर्वी उत्तीर्ण / प्रविष्ठ झालेले विद्यार्थी आणि सीबीएसई, आयसीएसई व अन्य मंडळांचे विद्यार्थी यांना सामाईक प्रवेश परीक्षेसाठी शुल्क भरावे लागणार आहे. यासाठी पेमेंट गेटवेची सुविधा उपलब्ध करून घेण्यात येणार आहे. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांची आवेदनपत्र भरण्याची प्रक्रिया बुधवार 28 जुलै रोजी दुपारी 3 वाजल्यापासून उपलब्ध करून देण्यात येत आहे. याबाबतचा तपशील स्वतंत्रपणे कळविण्यात येईल. तरी याबाबत संबंधीत विद्यार्थी, पालक व अन्य घटकांनी याची नोंद घ्यावी, असे राज्य मंडळाचे सचिव डॉ.अशोक भोसले यांनी स्पष्ट केले आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

14 hours ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

14 hours ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

4 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago