पवित्र पोर्टलमार्फत राबविण्यात येणाऱ्या खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षक भरतीसाठी जुलै अखेर मुलाखतीसाठीची उमेदवार निवड यादी जाहीर करण्यासाठी शिक्षण विभागाने जलद गतीने हालचाली सुरू ठेवलेल्या आहेत.
राज्य शासनाने 12 हजार शिक्षकांची भरती प्रक्रिया राबविण्याची घोषणा केली होती. यात आधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील मुलाखतीशिवायची भरती करण्यात आली. यात 6 हजार शिक्षकांना शाळांमध्ये नियुक्त्या मिळालेल्या आहेत. आता 900 खासगी शैक्षणिक संस्थांमधील 2 हजार 500 शिक्षकांची रिक्त पदे मुलाखती घेऊन भरण्यात येणार आहे. एका जागेसाठी दहा उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलाविण्यात येणार असून 30 गुणांसाठी मुलाखती होणार आहेत.
शाळा व्यवस्थापन समितीमार्फत ही मुलाखत प्रक्रिया पूर्ण करुन पात्र गुणवत्ताधारक उमेदवारांची अंतिम निवड करण्यात येणार आहे.
शिक्षण विभागाकडून या भरतीसाठी मुलाखतीकरिता उमेदवारांची निवड यादी तयार करण्याचे काम सुरु असून ती बारकाईने तपासण्यातही येत आहे. लवकरच पवित्र पोर्टलवर या भरतीबाबच्या सवीस्तर सूचना प्रसिध्द करण्यात येणार आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांकडून मिळालेली आहे.
शिक्षण विभागाकडून खासगी संस्थांना मुलाखती घेण्यासाठी ठराविक कालावधी निश्चित करुन देण्यात येणार आहे. याच कालावधीत वेळापत्रक तयार करुन उमेदवारांच्या मुलाखती घेण्याचे बंधनही घालण्यात येणार आहे. ऑगस्टमध्ये मुलाखतीची सर्व प्रक्रिया पूर्ण करुन सप्टेंबरमध्ये शिक्षकांना नियुक्त्या द्याव्या लागणार आहेत.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…