निवडणुकांच्या वेळी अनेक उमेदवारांवर पैसे वाटण्याचा आरोप होतो. परंतु देशात पहिल्यांदाच एक लोकप्रतिनिधीवर या प्रकरणात शिक्षा सुनावण्यात आली आहे. तेलंगाणा राष्ट्र समितीच्या महिला खासदार मलोत कविता यांना मतदारांना पैसे वाटल्याप्रकरणी कोर्टाने सहा महिन्यांची शिक्षा सुनावली आहे. कवित्या या तेलंगाणातील महबुबाबाद लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आहेत. कविता यांच्यासह त्यांच्या एका सहकार्यालाही ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत कविता यांचे सहकारी शौकत अली मतदारांना 500 रुपये देऊन कविता यांना मतदान करण्याचे आवाहन करत होता. तेव्हा महसूल अधिकार्यांनी त्यांना रंगे हात पकडले.
पोलिसांनी जेव्हा शौकत अली यांची कसून चौकशी केली तेव्हा आपण कविता यांच्यासाठी हे पैसे वाट असल्याचे कबुल केले. अखेर कोर्टात कविता यांच्याविरोधात सबळ पुरावे आढळले आणि त्यांना या प्रकरणी 6 महिन्यांचा कारावास आणि 10 हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. असे असले तरी उच्च न्यायालायत अपील करण्यासाठी त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…