दहशत माजविण्यासाठी हातात शस्त्रास्त्र घेउन व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवणाऱ्या दोघांविरूद्ध गुन्हे शाखेने कारवाई केली आहे. रोहन रमेश घोलप (वय 21 रा. गोखले नगर )आणि अखिल ऊर्फ गणेश विलास देशमुख (वय 30 रा. कसबा) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याविरूद्ध डेक्कन व फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तलवार, कोयता, चाकू बनविणारे व शस्त्र जवळ बाळगणाऱ्याविरूद्ध गुन्हे शाखेकडून विशेष मोहीम राबविण्यात येत होती. त्यानुसार आरोपी रोहन घोलप हातात तलवार घेऊन व्हॉटसअॅप स्टेटस ठेवल्याची माहिती पोलीस अमलदार सचिन जाधव यांना मिळाली. त्यानुसार घोलप तलवार सह झेड ब्रिजवर थांबल्याचे समजातच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
त्याच्याविरूद्ध डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
केक कापल्यानंतर सराईताने व्हॉट्सअॅपवर हातात तलवार घेतल्याचा स्टेटस ठेवल्याची माहिती पोलिस अमलदार अजय थोरात यांना मिळाली. त्यानुसार अखिल ऊर्फ गणेश विलास देशमुख याला पथकाने ताब्यात घेतले.
त्याच्याविरूद्ध फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कामगिरी श्रीनिवास घाडगे, एसीपी सुरेंद्र देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे, पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड, सुनिल कुलकर्णी, अजय थोरात, सचिन जाधव, शशिकांत दरेकर, दत्ता सोनवणे, विजयसिंह वसावे, तुषार माळवदकर, महेश बामगुडे यांनी केली.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…