ताज्याघडामोडी

पंढरपूर परिसरातील नदी काठच्या गावांना तहसिलदार बेल्हेकर यांनी दिली भेट

पंढरपूर परिसरातील भीमा –निरा खोऱ्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे निरेवरील धरणातून पाणी सोडले जाण्याची शक्यता आहे. तसेच उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार सुरु असल्याने भीमा नदीची पाणी पातळी वाढण्याची शक्यता असल्याने भीमा व नीरा नदी काठच्या गावांनी सतर्क राहावे ,असे आवाहन तहसिलदार सुशिलकुमार बेल्हेकर यांनी केले आहे.

यावेळीसंभाव्य पूरपरिस्थिती निर्माण होऊ शकणाऱ्या शिरढोन, कौठाली, खेडभोसे, देवडे, पटवर्धन कुरोली व पिराची कुरोली या गावांना भेट दिली व पूरपरिस्थिती मध्ये कमीत कमी जीवित व वित्त हानी व्हावी म्हणून नियोजन केले.

गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीने तसेच पूर परिस्थितीमुळे तालुक्यातील शेत पिकांची व सार्वजनीक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. संभाव्य आपत्तीवर वेळेत व प्रभावीपणे कार्यवाही पार पाडण्यासाठी सर्व विभाग प्रमुखांनी समन्वय ठेवावा. वेळोवळी पाणी पातळीत होत असलेल्या बदलांबाबत नदीकाठच्या गावांना अवगत करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवावी. नदीकाठच्या नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. तसेच तात्पुरत्या निवाऱ्यासाठी सुरक्षित असलेल्या शासकीय इमारती, शाळा, मंदीर या ठिकाणी निवाऱ्याची व्यवस्था करावी.

आरोग्य विभागाने मुबलक प्रमाणात औषधसाठा उपलब्ध ठेवावा, विद्युत पुरवठा सुरळीत व सुरक्षित राहील याची दक्षता वीज वितरण कंपनीने घ्यावी अशा सूचनाही तहसिलदार बेल्हेकर यांनी यावेळी केल्या.
आपत्कालीन परस्थितीत ग्रामस्तरीय समितीने सतर्क रहावे, शासकीय कर्मचाऱ्यांनी मुख्यालयाच्या ठिकाणीच थांबावे . तसेच महसूल, पोलीस, लघुपाटबंधारे, जलसंधारण, पाणी पुरवठा, आरोग्य, सार्वजनीक बांधकाम, कृषी व ग्रामपंचायत विभागांनी एकमेकांच्या संपर्कात रहावे अशा सूचनाही बेल्हेकर यांनी यावेळी दिल्या.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

5 hours ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

4 days ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

5 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

3 weeks ago