ताज्याघडामोडी

मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत महाव्दार काला साजरा

नामदास व हरिदास यांच्या वंशजाकडून साजरा करण्यात येणारा महाव्दार काला मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत मात्र उत्साहात पार पडला. यानंतर खर्‍या अर्थाने आषाढी वारीची सांगता झाल्याचे मानले जाते.

संत नामदेव महाराज व संत पांडुरंग महाराज हरिदास यांच्या वंशजाकडून महाव्दार काला करण्याची चारशेहून अधिक वर्षाची परंपरा आहे. पांडुरंग महाराज हरिदास यांना प्रत्यक्ष विठ्ठलाने आपल्या खडावा अर्थात पादुकाचा प्रसाद देत काला करण्याची आज्ञा दिली होती. त्यानुसार हरिदास घराण्यात अकरा पिढ्यापासून हा उत्सव साजरा केला जातो.

संत नामदेव महाराजांच्या वंशजांना येथे दिंडीचा मान आहे. दरम्यान कोरोनाच्या पार्श्‍वभूमिवर यंदा काल्यासाठी श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरात केवळ अकरा जणांना प्रवेश देण्यात आला. परंपरे प्रमाणे दुपारी बारा वाजता काल्याचे मानकरी मदन महाराज हरिदास यांच्या मस्तकावर देवाच्या पादुका पागोट्याने बांधण्यात आल्या. यानंतर मंदिरातील सभामंडप येथे पाच प्रदक्षिणा पूर्ण केल्यानंतर दही हंडी फोडण्यात आली.

यानंतर हा उत्सव महाव्दार घाटावरून चंद्रभागेचे वाळवंट, कुंभार घाट, माहेश्‍वरी धर्मशाळा, आराध्ये गल्ली, हरिदास वेस येथून काल्याच्या वाड्यात दाखल झाला. यावेळी उपस्थित भाविकांकडून कुंकू, बुक्याची उधळण करण्यात येत होती.येथे उपस्थितांना लाह्या, दही, दूध आदी पासून बनविलेल्या काल्याचे वाटप करण्यात आले. मागील वर्षी प्रमाणे यंदा देखील कमी भाविकांच्या उपस्थितीत महाव्दार काला पार पडला. महाव्दार काला साजरा झाल्यानंतर पंढरीतील संचारबंदी उठविण्यात आली.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

5 hours ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

4 days ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

5 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

3 weeks ago