कोरोना महामारीच्या तिसर्या लाटेची शक्यता वर्तवली जात असताना व्हॅक्सीनबाबत एक दिलासादायक बातमी आहे. अखिल भारतीय वैद्यकीय संस्था , दिल्लीचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटले की, झायडस कॅडिलाने ट्रायल पूर्ण केली आहे आणि त्यांना आता आपत्कालीन वापराची परवानगी मिळण्याची प्रतिक्षा आहे. सप्टेंबर महिन्यापासून 18 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांचे सुद्धा लसीकरण सुरू होण्याची शक्यता आहे. जर सप्टेंबरपासून या वयाच्या लोकांचे लसीकरण सुरू झाले तर हा निश्तिपणे एक मोठा दिलासा असेल.
सप्टेंबरपासून सुरू होईल लसीकरण
एनडीटीव्हीशी बोलताना डॉ. गुलेरिया यांनी म्हटले की, मला वाटते की, Zydus ने अगोदरच चाचणी केली आणि आणि ते आपत्कालीन वापराची प्रतिक्षा करत आहेत. भारत बायोटेकच्या Covaxin ची चाचणी ऑगस्ट किंवा सप्टेंबरपर्यंत समाप्त झाली पाहिजे, आणि तोपर्यंत आपल्याला एक मंजूरी मिळाली पाहिजे. फायजर व्हॅक्सीनला अगोदरच एफडीए (अमेरिकन नियामक – अन्न आणि औषध प्रशासन) ने मंजूरी दिली आहे. आशा आहे की सप्टेंबरपर्यंत आपण मुलांचे लसीकरण सुरू करू. यामुळे कोविडच्या ट्रान्समिशनची चैन तोडण्यास मदत होईल.
आतापर्यंत 42 कोटीपेक्षा जास्त लोकांना लस
भारताने आतापर्यंत 42 कोटीपेक्षा जास्त लोकांना व्हॅक्सीनचे डोस दिले आहेत आणि आपल्या जवळपास 6 टक्के लोकसंख्येला लस दिली आहे. तर सरकारचे लक्ष्य या वर्षाच्या अखेरपर्यंत सर्व प्रौढांचे लसीकरण करण्याचे आहे. तिसर्या लाटेच्या चिंतेदरम्यान देशात आतापर्यंत मुलांसाठी व्हॅक्सीनची मंजूरी मिळालेली नाही.
शुक्रवारी युरोपियन मेडिसिन्स वॉचडॉगने 12 ते 17 वर्षाच्या मुलांसाठी मॉडर्नाच्या कोरोना व्हायरस व्हॅक्सीनला मंजूरी दिली.
अमेरिकेने मे महिन्यादरम्यान 12 ते 15 वर्षाच्या वयाच्या मुलांसाठी फायजर-बायोएनटेक कोविड -19 व्हॅक्सीन अधिकृत केली होती.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…