ताज्याघडामोडी

जातो माघारी पंढरी नाथा । तुझे दर्शन झाले आता ॥  पालख्यांचा परतीचा प्रवास सुरु

॥  जातो माघारी पंढरी नाथा । तुझे दर्शन झाले आता ॥ 

पालख्यांचा परतीचा प्रवास सुरु

 

पंढरपूर दि. 24: –  आषाढी वारीतील गोपाळकाल्यासाठी गोपाळपूर येथे ज्ञानेश्वर माऊली तुकाराम या जयघोषात सर्व संतांच्या पालख्या दाखल झाल्या. गोपाळ काला गोड झाला। गोपाळाने गोड केला ॥  या गजरात  वारकरी, भाविकांनी गोपाळकाला केला.

             संतश्रेष्ठ संत ज्ञानेश्‍वर महाराज व जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यासह अन्य मानाच्या  पालखीचे  गोपाळपुरात आगमन झाल्यानंतर व विसावल्यानंतर  गोपाळपूर येथे पालख्यांचे स्वागत व पूजा करण्यात आली.

 श्री विठ्ठलाची भेट

            मानाच्या  पालख्यांनी गोपाळकाला गोड केल्यानंतर श्री विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी विठ्ठल मंदीरात आल्या आणि सावळ्या विठ्ठलाचे दर्शन घेतले. यावेळी मंदीर समितीच्या वतीने  पालखी सोहळा प्रमुख, मानकरी आदींचा सत्कार करण्यात आला.आषाढी  वारीच्या सोहळ्यात विठ्ठल दर्शनाची आस पुर्ण झाल्यानंतर  जातो  माघारी  पंढरी  नाथा । तुझे दर्शन झाले आता ॥  यानुसार सर्व पालख्यांचा परतीचा प्रवास सुरु झाला.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

5 hours ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

4 days ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

5 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

3 weeks ago