१९ जुलै रोजी खानापूर तालुक्यातील बाणूरगड येथे स्वराज्याच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक यांच्या स्मारकाचे भूमिपूजन माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने झाले. या कार्यक्रमास भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्याशी अनेकजण उपस्स्थत होते. या कार्यक्रमास गर्दी जमविल्याप्रकरणी व आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह चार जणांवर विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
खानापूर तालुक्यातील बाणूरगड येथे बहिर्जी नाईक यांच्या स्मारकाचा भूमिपूजन कार्यक्रम १९ जुलै रोजी पार पडला.या कर्यक्रमास आमदार गोपीचंद पडळकर, सांगली जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर, जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष शिवाजीराव डोंगरे, बाणूरगडचे सरपंच सज्जन बाबर, उपसरपंच कांताताई गायकवाड यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमात गर्दी जमविल्या प्रकरणी आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह अन्य चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाणूरगड येथे आयोजित केलेला भूमिपूजन कार्यक्रम हा सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या बंदी आदेशाचे उल्लंघन करुन घेण्यात आला. तसेच बहिर्जी नाईक यांच्या स्मारकाच्या भूमिपूजन कार्यक्रमास १५० ते १७० लोक उपस्थित होते. त्यामुळे भारतीय दंड संहिता अधिनियम १८६० चे कलम १८८, भारतीय साथ रोग अधिनियम १८९७ कलम ११, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ५१ अ प्रमाणे बाणूर गडचे सरपंच सज्जन बाबर, निलेश नेताजी पाटील (रा. खंबाळे (भा)), आमदार गोपीचंद पडळकर आणि माजी समाजकल्याण सभापती ब्रम्हानंद पडळकर या चोघांविरोधात विटा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची फिर्याद विट्याचे नायब तहसीलदार चेतन कोनकर यांनी दाखल केलेली आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…