ताज्याघडामोडी

महाराष्ट्रात ऑक्सिजनविना एकही मृत्यू नाही,आरोग्यमंत्री टोपेंचा दावा

महाराष्ट्रात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान ऑक्सिजनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली होती. राज्याकडे उपलब्ध असणारा साठा मर्यादित होता. रात्रीतून गाडी पोहोचली नाही, तर सकाळी ऑक्सिजन मिळणार नाही, अशी परिस्थिती राज्यात होती. मात्र ऑक्सिजनअभावी महाराष्ट्रात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही, असा दावा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केला आहे.

कोरोनाची दुसरी लाट कळस गाठत असताना राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होईल, अशी परिस्थिती होती. मात्र प्रत्यक्षात उपलब्ध असलेल्या ऑक्सिजनचं योग्य नियोजन आणि व्यवस्थापन केल्यामुळे कुठेही ऑक्सिजनअभावी रुग्णांचा मृत्यू झाला नाही, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्यात ऑक्सिजन मर्यादित असल्यामुळे तो वाया जाणार नाही, याचीदेखील खबरदारी घेतली गेली, असं टोपेंनी सांगितलं आहे.

अपघात झाले पण6 हजा…

नाशिकमध्ये घडलेली दुर्घटना हा अपघात होता. मात्र त्या घटनेत गेलेले बळी हे ऑक्सिजनअभावी गेलेले बळी असं म्हणणं चुकीचं होईल, असं टोपे म्हणादेखले. तो एक अपघात होता आणि असे अपघात इतरत्र होऊ नयेत, याची खबरदारी घेण्यात आली होती, असं टोपे म्हणाले. राज्यात ऑक्सिजनचं व्यवस्थापन करणारी यंत्रणा आणि त्याचा प्रत्यक्ष वापर करणारी यंत्रणा यांच्या समन्वयामुळे हे शक्य झाल्याचं ते म्हणाले. ऑक्सिजन लावलेला एखादा रुग्ण स्वच्छतागृहात जात असेल तरी तेवढ्या वेळेपुरताही ऑक्सिजनचा पुरवठा बंद केला जात होता, असं सांगत काटकसर केल्यामुळेच ऑक्सिजन सर्वांना पुरवता आल्याचं त्यांनी सांगितलं. राज्य सरकारनं प्रतिदिन 16 मेट्रिक टन ऑक्सिजन उपलब्ध केला आणि यापुढेही ऑक्सिजनचा तुटवडा पडेल, याची शक्यता नसल्याचं ते म्हणाले.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

7 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago