आसाममधील एका महिला डॉक्टरला एकाच वेळी कोरोनाच्या डेल्टा आणि अल्फा या दोन्ही व्हॅरियंट्सची लागण झाल्याचे संशोधनातून स्पष्ट झाले आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च या संस्थेच्या दिब्रुगड येथील प्रादेशिक वैद्यकीय संशोधन केंद्रात केलेल्या चाचण्यांमधून यावर शिक्कामोर्तब झाले आहे. एकाच वेळी दोन प्रकारच्या व्हॅरियंट्सची लागण होण्याची ही भारतातील पहिलीच ज्ञात घटना असू शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस संबंधित महिला डॉक्टरने घेतले होते. दुसरा डोस घेतल्यानंतर एका महिन्यानंतर या डॉक्टरला कोरोनाच्या दोन्ही व्हॅरियंट्सची लागण झाली आहे.तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले नाही. तसेच तिला लक्षणेही सौम्य प्रकारची होती. घरच्या घरीच केलेल्या उपचारांनी ती बरी झाली. संबंधित महिलेचे पतीही डॉक्टर असून, त्यांनाही अल्फा व्हेरियंटची लागण झाली होती. हा व्हेरियंट सर्वांत आधी ब्राझीलमध्ये आढळला होता.
अशा प्रकारचा दुहेरी संसर्ग तेव्हाच होतो, जेव्हा दोन व्हॅरियंट्सची एखाद्या व्यक्तीला एकाच वेळी किंवा अगदी थोड्या अंतराने लागण होते. एखाद्या व्यक्तीला एका व्हॅरियंटचा संसर्ग होतो, त्यानंतर दोन-तीन दिवसांत आणि शरीरात अँटीबॉडीज विकसित होण्याच्या आधी दुसऱ्या व्हॅरियंटचा संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यास किंवा कोणत्याही प्रकारे संपर्कात आल्यास दुसऱ्या व्हॅरियंटचा संसर्ग होऊ शकतो, असे प्रादेशिक वैद्यकीय संशोधन केंद्रातील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. बी. जे. बोर्काकोटी यांनी सांगितले.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…