गुन्हे विश्व

भाजपच्या माजी नगरसेवकाने दिली खुनाची सुपारी,घटनेपूर्वीच सुपारी किलर पोलिसांच्या ताब्यात

पुणे कॅन्टोन्मेंटचे माजी उपाध्यक्ष व भाजपचे माजी नगरसेवक विवेक महादेव यादव यांनी त्यांचा विरोधक असलेल्या बबलू गवळी याच्या खूनाची सुपारी कारागृहातून सुटलेल्या सराईत गुन्हेगार व त्याच्या साथीदाराला दिली असल्याची व हे दोन्ही सराईत सुपारी किलर खुनाच्या हेतूने वावरत असल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळताच पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे गस्तीवर असताना पोलीस कर्मचारी सुशील धिवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने कारवाई करत राजन जॉन राजमनी (वय 38, रा.भाग्योदय नगर, कोंढवा), इब्राहिम उर्फ हुसेन याकुब शेख (वय 27, रा काळा खडक वाकड,पिंपरी-चिंचवड) या दोघा सुपारी किलरना पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे.

खुनाची सुपारी घातलेले दोघे आरोपी कोंढवा परिसरात येणार असल्याची खबर मिळताच सापळा रचून दोघांना अटक करण्यात आली असता त्यांच्या  अंगझडतीत तीन पिस्तूले, तीन काडतूसे व रोख 1 लाख 20 हजार रुपये मिळाले.आरोपीना पोलिसी खाक्‍या दाखवताच त्यांनी विवेक यादव यांनी सुपारी दिल्याची कबुली दिली.आरोपीकडून हस्तगत करण्यात आलेल्या  मोबाईलचे कॉल डिटेल्स तपासले असता त्यामध्ये राजन याने व्हिके व व्हिके न्यू या नावाने सेव्ह असलेल्या दोन मोबाईल क्रमांकावर संशयास्पद संभाषण झाले असल्याचे दिसून आले आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

20 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago