विविध गंभीर गुन्ह्यात माढा सबजेलमध्ये अटकेत असलेले सिद्धेश्वर कैचै,अकबर सिद्दाप्ना पवार,आकाश उर्फ अक्षय राॅकी भालकर,तानाजी लोकरे चार सराईत गुन्हेगार ड्युटीवर असलेल्या पोलिसांशी झटापट करून पळून जाण्यात यशस्वी ठरले असून या घटनेमुळे माढा तालुक्यात खळबळ उडाली आहे.या चारही आरोपीना ताब्यात घेण्यासाठी माढा पोलीस प्रयत्नांची शिकस्त करत असून सर्वत्र कडक नाकाबंदी करून आरोपींचा शोध घेतला जात आहे.
बेकायदेशीर हत्यारे जवळ बाळगण्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या अकबर पवार याने कोठडीतच झटका आल्याचे नाटक केले.त्यावेळी कर्तव्यावर असलेले पोलीस कर्मचारी अकबर यास कोठडीतून बाहेर काढत असतानाच इतर आरोपींनी पोलिसांशी जोरदार झटापट करण्यास सुरुवात केली.यात हे चारही गुन्हेगार पसार होण्यात यशस्वी ठरले आहेत.
पळून जाण्यात यशस्वी ठरलेल्या आरोपी आकाश उर्फ अक्षय राॅकी भालकर याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल आहे तर सिद्धेश्वर कैचै हा मोडनिंब येथील आठवडा बाजारात बनावट नोटा चलनात आणताना सापडला होता.तर तानाजी लोकरे याच्यावर पाॅस्को कायद्यार्तंगत गुन्हा दाखल असल्याने अटकेत होता
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…