ताज्याघडामोडी

पंढरपूर तालुक्यातील आरोग्य उपकेंद्रांसाठी पाच कोटी निधी मंजूर -आ प्रशांत परिचारक

 आरोग्यसेवा आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य यांच्याकडून शासकीय आरोग्य संस्था श्रेणीवर्धन व बांधकामासाठी आशिया विकास बँक यांच्यामार्फत प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या निर्मितीसाठी चार कोटी ८०लाख रुपयांच्या निधीस मंजुरी मिळाल्याची माहिती आमदार प्रशांत परिचारक यांनी दिली.

 पंढरपूर तालुक्यातील सोनके, पेहे, शिरढोण, जळोली  या  गावांकरिता नवीन प्राथमिक आरोग्य उपकेंद्राला प्रत्येकी एक कोटी २०लाख प्रमाणे निधी मंजूर झाला आहे, यामध्ये आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीचे बांधकाम करणे, उपकरणे, यंत्रसामुग्री, विज, पाणी आदी बाबींचा समावेश आहे. सदरचा निधी आशिया विकास बँकेकडून ७० टक्के व राज्य शासनाकडून ३० टक्के इतका मंजूर करण्यात आलेला आहे. पंढरपूर तालुक्यातील या चार प्राथमिक आरोग्य उपकेंद्राला मंजूर अनुदान प्राप्त करण्यासाठी उपकेंद्राचे अंदाज व आराखडे शासनाकडे सादर करणे क्रमप्राप्त असून या अंदाज व आराखड्यामध्ये मुख्य इमारत, निवास व्यवस्था, फर्निचर, साहित्य सामग्री, वीज, पाणी, कंपाऊंड, अंतर्गत रस्ते या सर्व बाबींचा समावेश असावा असे नमूद केलेले आहे.

 ही सर्व कामे जिल्हा परिषदेच्या मार्फत करण्यात येणार असून याबाबत संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना सूचना करण्यात आल्याचे आमदार  प्रशांत परिचारक यांनी सांगितले. यासाठी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आ समाधान आवताडे, जि प सदस्या रजनीताई देशमुख, शोभा वाघमोडे, संगीता गोसावी, वसंत नाना देशमुख, सुभाष माने, रुक्मिणी ढोणे, पंचायत समितीच्या सभापती अर्चना व्हरगर, उपसभापती राजश्री भोसले आदींनी पाठपुरावा केला होता.

]]]

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

2 hours ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

4 days ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

5 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

3 weeks ago