शिवसेना पक्ष प्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून राज्यभरात संपर्क अभियान राबविण्यास सुरुवात.
शिवसेना पक्ष प्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून राज्यभरात संपर्क अभियान राबविण्यास सुरुवात झाली असून, शिवसेनेने शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक पंढरपूर शहरातील प्रत्येक भागात, प्रभागात जाऊन सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणी जाणून घेणार आहेत, राज्याचे मुख्यमंत्री या नात्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब हे जनतेच्या हितासाठी करीत असलेल्या कार्य, जनतेच्या आरोग्यरक्षणासाठी घेत असलेले विविध निर्णय आणि याबाबत जनतेचे प्रबोधन या शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कार्यरत असताना शिवसेनेचे कान आणि डोळे असलेले शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक या शिवसंपर्क अभियानातुन जनतेच्या समस्या जाणून घेतील व त्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचवतील अशी ग्वाही या शुभारंभप्रसंगी आयोजित बैठकीत शिवसेना माजी जिल्हाप्रमुख मा. साईंनाथ भाऊ अभंगराव यांनी दिली.
या शिवसंपर्क अभियानाचे फॉर्म वाटप शिवसेना सोलापुर उपजिल्हा प्रमुख मा. सुधीर भाऊ अभंगराव यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना शिवसेनेचे पंढरपुर शहर प्रमुख मा.रविंद्र मुळे यांनी या शिवसंपर्क अभियाना निमित्त शहरातील सर्व शाखाप्रमुख व शिवसैनिक त्या त्या भागातील नागरिकांच्या घरोघरी जाऊन सामान्य जनतेच्या समस्या जाणून घेत त्या सोडविण्यासाठी आग्रही भूमिका घेत तोच प्रयत्न करतील अशी ग्वाही देत पंढरपूर नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत शिवसेना सामान्य जनतेच्या पाठबळावर मोठे यश संपादन करेल असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी बोलताना सोलापुर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य मा. महेश नाना साठे यांनी या शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून राज्य शासनाने घेतलेले अनेक लोकहिताचे निर्णय जनतेपर्यंत पोहोचवणे, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी जाहीर केलेल्या योजनेचा लाभ प्रत्येक गरजुंना घेता यावा यासाठी याची माहीती प्रभागातिल नागरिकांना देवून त्यातील त्यांच्या अडचणी दूर करुन पंढरपुरशहरात येवू घातलेल्या नगरपरिषदेच्या निवडणुकित शिवसेनेचे नगरसेवक पंढरपूर नगरपरिषद मध्ये कसे जातील यावर सर्व शिवसैनिकांनी भर देऊन सर्व तळागाळातील शिवसैनिकांना बरोबर घेवुन शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, विभाग प्रमुख, उपशहर प्रमुख यांनी आपल्या प्रभागात शिवसेना रुजवण्याचा प्रयत्न करावा, आशाप्रकारे त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत शिवसेना वाढीसाठी नव्या आणि जुन्या शिवसैनिकांना उत्कृष्ट मार्गदर्शन केले.
या शिवसंपर्क अभियानाचे आयोजन पंढरपुर शहरातील जुना कराड नाका, गाताडे प्लॉट येथे शिवसेनेचे जेष्ठ शिवसैनिक मा. काकासाहेब बुराडे व शिवसेना पंढरपुर उपशहर प्रमुख मा. लंकेश काकासाहेब बुराडे यांनी केले होते.
यावेळी जेष्ठ शिवसैनिक मा.जयवंत ( आण्णा ) माने, मा.कसाब रावसाहेब उर्फ़ कमलीवाले चाचा, मा. माऊली अष्टेकर, मा. नितिन शेळके-पाटील, शिवसेना उपशहर प्रमुख मा. पोपट नाना सावतराव, मा. विनय वनारे, मा. तानाजी मोरे, शिवसेना पंढरपुर शहर कार्याध्यक्ष अनिल कसबे, शिवसेना पंढरपुर शहर सचिव मा.कैलास लोकरे, शिवसेना पंढरपुर शहर संघटक मा.गणेश घोडके, शिवसेना शहर प्रसिद्धी प्रमुख मा.अमित ( पिंटू ) गायकवाड, शिवसेना विभाग प्रमुख मा. पंकज डांगे-कोळी, मा. राघवेंद्र ऐनापुरे, शाखा प्रमुख मा. नारायण ( पिंटू ) रेड्डी, मा. विजय गंगने, मा. प्रणित पवार, मा. गणेश पवार, मा. प्रशांत बागडे, मा. अक्षय सोनार, मा. नवनाथ अंकुशराव, मा. पिंटू पवार, मा. अतुल खंडागळे, मा. राहुल पाटील, मा. गुरु अष्टेकर, मा. अभिजित चव्हान, मा.समाधान भुजंगे, मा.सुरेश पवार, मा. सालुंखे, शेखर ननवरे, उमेश शापुरकर व इतर शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…