मेहुण्यानेच तरुणाची कुर्हाडीने वार करुन हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर शहरात गुरुवारी रात्री ही घटना घडली. संशयित मेहुणा विजय सावकारे घटनास्थळावरून पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
मुक्ताईनगर शहरात गुरुवारी रात्री तरुणाची हत्या झाली. शुक्रवारी पहाटे हा प्रकार उघडकीस आला. विशाल वामन ठोसरे असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. कुर्हाडीने वार करुन त्याची हत्या करण्यात आली. विशालच्या मेव्हण्यानेच ही हत्या केल्याचा संशय आहे. घटनास्थळी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनचे निरीक्षक राहुल खताळ दाखल झाले असून पोलिसांचा तपास सुरु आहे.संशयित मेहुणा विजय सावकारे घटनास्थळावरुन फरार असल्याने त्याचा शोध सुरू आहे.
उल्हासनगरातही मेहुण्याकडून हत्या
दुसरीकडे, उल्हासनगरमध्येही मेव्हण्याने आपल्या भाऊजींची म्हणजेच बहिणीच्या पतीची हत्या केल्याची घटना गेल्या महिन्यात घडली होती. ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरमध्ये कॅम्प 3 भागातील सुभाष नगर परिसरात ही घटना घडली. भाऊजी बहिणीला मारहाण करताना झटापट झाली, अखेर भाऊजींनी उगारलेला चाकू मेहुण्याने त्यांनाच खुपसल्याचा आरोप आहे.मयत सचिन खेडेकर हा पत्नी शुभांगी खेडेकर सोबत उल्हासनगरमधील सुभाष नगर भागात वास्तव्याला होता. सचिन हा व्यसनाधीन असल्याचं बोललं जातं. तो सतत पत्नी शुभांगीला मारहाण करायचा. घटनेच्या रात्री सुद्धा त्याने पत्नीला मारहाण करायला सुरुवात केली. यावेळी त्याचा मेव्हणा रोशन जाधव हा वाद सोडवण्यासाठी आला. सचिनने आपल्या पत्नीला मारण्यासाठी चाकू आणला होता, मात्र सचिनने तो चाकू मेहुणा रोशनवरच उगारला. रोशनने कसाबसा स्वतःचा बचाव केला आणि तोच चाकू सचिनला भोसकला. यात सचिनचा जागीच मृत्यू झाला.
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…
पंढरपूर–‘करिअर करत असताना अपयश आले तरी हरकत नाही, परंतू प्रयत्न मात्र सोडू नयेत. इंजिनिअरिंग पूर्ण…
श्री. पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालयातील तृतीय वर्षा मध्ये शिकत असणार्या…