गुन्हे विश्व

गुरु-शिष्याच्या नात्याला काळीमा

नागपूर : नागपुरात गुरु-शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. अरबी भाषेचे शिक्षण देणाऱ्या शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवत तिच्यावर अत्याचार केल्याची घटना नागपूरच्या मानकापूर पोलीस स्टेशन हद्दीत समोर आली आहे. रफिक खान उर्फ मौलाना हाफिज असे आरोपीचे नाव आहे. पीडित तरुणीच्या तक्रारीवरून मानकापूर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

आरोपीकडून लॉकडाऊन काळात पीडितेच्या कुटुबियांना मदत

या प्रकरणातील पीडित अल्पवयीन मुलीची आरोपी रफिक खानसोबत जुनी ओळख आहे.लॉकडाऊनच्या काळात आरोपीने पीडित कुटुंबाची थोडी मदत केली होती ज्यामुळे त्यांचा आरोपीवर विश्वास बसला होता. आरोपी रफिक हा अरबी भाषा शिकवत असल्याने पीडित तरुणीने त्याच्याकडे शिकवणी लागली होती.

पीडितेकडून अखेर पोलिसात तक्रार

आरोपीने पिडीत विद्यार्थिनीला तुझ्या कुटुंबाची मदत करणार असल्याचे सांगत जवळीक साधली. त्याने पीडितेला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर आरोपी तिला मानसिक आणि शारीरिक त्रास देत असल्याने पीडित तरुणीने सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांकडून आरोपीला अटक

आरोपीने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते. मार्च महिन्यात त्याने पीडित तरुणीसोबत साखरपुडा करण्याचा प्रयत्न देखील केला होता. मात्र या संदर्भात बाल सुरक्षा अधिकाऱ्यांनी आरोपीचा हा प्रयत्न हाणून पाडत पीडितेची रवानगी बाल सुधारगृहात केली होती. काही दिवस तिथे राहिल्यानंतर तरुणी घरी परत आली. मात्र त्यानंतर सुद्धा आरोपी वारंवार भेटायला बोलवत असल्याने त्याच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडितेने आरोपी विरुद्ध बलात्काराची तक्रार दाखल केली आहे, ज्याच्याआधारे पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago