देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या ग्राहकांना सतर्क करण्यासाठी बँकेने एक ट्विट केले आहे. ज्यामध्ये त्यांनी अशी माहिती दिली आहे की, उद्या म्हणजे 16 जुलै रोजी बँकेच्या काही विशेष सेवा 2 तास 30 मिनिटांसाठी बंद ठेवल्या जाणार आहेत. यावेळी ग्राहकांना या सेवा वापरता येणार नाहीत.
मात्र ग्राहकांना डिजिटल पेमेंटमध्ये कोणतीही अडचण येणार नाही. स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांशी संबंधित सेवा सुधारण्याचे काम करीत आहे. डिजिटल पेमेंट्स सेवा अधिक चांगली होण्यासाठी बँक निरंतर देखभाल आणि अपग्रेडेशन कार्य करते. गुरुवारीही अपग्रेडेशनचे काम सुरू राहील.
एसबीआय योनो सेवा
योनो एकात्मिक डिजिटल बँकिंग प्लॅटफॉर्म आहे.एसबीआय वापरकर्त्यांचा उपयोग आर्थिक सेवा तसेच फ्लाईट, ट्रेन, बस आणि टॅक्सी बुकिंग, ऑनलाईन शॉपिंग किंवा मेडिकल बिल पेमेंटसारख्या इतर सेवांसाठी केला जाऊ शकतो. योनो अँड्रॉईड आणि आयओएस दोन्ही स्मार्टफोनवर सहजपणे चालविला जाऊ शकते.
वेळ आणि तारीख लक्षात ठेवा
16 जुलै 2021 रोजी रात्री 10.45 वाजता दुसर्या दिवशी सकाळी 01.15 वाजताच्या दरम्यान बँक देखभाल दुरुस्ती करणार आहे. यादरम्यान, इंटरनेट बँकिंग, योनो अॅप, योनो लाईट आणि यूपीआय या सेवा दोन तास 30 मिनिटांसाठी बंद असतील आणि ग्राहकांना त्यांचा वापर करता येणार नाही.
भारतीय स्टेट बँक ही देशातील सर्वात मोठी व्यावसायिक बँक
भारतीय स्टेट बँक ही देशातील सर्वात मोठी व्यावसायिक बँक आहे. या बँकेच्या एकूण 22,000 हून अधिक शाखा आणि 57,889 एटीएम देशभरात उपलब्ध आहेत. 31 डिसेंबर 2021 पर्यंत एसबीआयकडे 8.5 कोटी इंटरनेट बँकिंग ग्राहक आणि 1.9 कोटी मोबाईल बँकिंग वापरकर्ते आहेत. डिसेंबर 2020 अखेर एसबीआयच्या यूपीआय वापरकर्त्यांची एकूण संख्या 13.5 कोटी होती. सध्या एसबीआय योनोकडे एकूण 3.5 कोटी नोंदणीकृत वापरकर्ते आहेत.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…