राजगुरुनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयातील सरकारी वकील देवेंद्र मधुकर सोन्निस (वय ५७ रा. पुणे) यांना साडेतीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना पुणे लाचलुचपत विभागाच्या पोलिसांनी रंगेहात पकडून अटक केली. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
राजगुरूनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात २ महिन्यापासून सरकारी वकील म्हणून देवेंद्र मधुकर सोन्निस हे काम पाहत आहेत. आज दि.१४ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास पुणे लाच लुचपत विभागाच्या पोलिसांनी त्यांना लाच स्वीकारताना अटक केली.यातील तक्रारदार यांच्या आशीलाचा जामीन अर्ज न्यायालयात सुनावणीसाठी आहे.सुनावणी होत असताना न्यायालयात हरकत घेऊ नये व जामीन मिळण्यासाठी मदत करण्यासाठी लोकसेवक देवेंद्र सोन्निस यांनी तक्रार दाराकडून पाच हजार रुपयांची मागणी केली होती.
पाच हजाराची लाच घेण्याचे ठरल्यानंतर तक्रारदाराने पुणे लाच लुचपत विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार आज राजगुरुनगर येथे लाचलुचपत विभागाच्या पोलिसांनी सापळा रचून तडजोडी अंती तक्रारदार यांच्याकडून साडेतीन हजार रुपये लाच स्वीकारताना एसीबी च्या पोलिसांनी त्यांना रंगेहात पकडले.या घटनेमुळे पुणे जिल्ह्यासह सर्वत्र खळबळ उडाली आहे. यासंदर्भात खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कारवाई लाचलुचपत विभागाच्या पोलिसांकडून सुरू आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…