गुण वाढविण्याचे आमिष दाखवत बारावीतील विद्यार्थिनीला शरीर सुखाची मागणी करण्याऱ्या विकृत लिपीकाला मुलीच्या कुटूंबियांनी काळे फासत धिंड काढली. त्याला चोप देत पोलीस ठाण्यात तक्रार दिली. अभिजित पवार (वय 34, रा. वडगाव बुद्रुक) याच्याविरूद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात विनयभंग व इतर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील एका नामांकित महाविद्यालयात अभिजित पवार लिपीक आहे. संबंधित महाविद्यालयात पीडित मुलगी बारावीच्या वर्गात शिक्षण घेते. तिला मार्क वाढवून देतो म्हणून अभिजीतने शरीर सुखाची मागणी केली होती. तो सतत मुलीला शरीर सुखाची मागणी करत होता. त्रास सहन न झाल्याने पीडितीने घरच्यांना माहिती दिली.त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. मुलीने त्याचे फोनवरील बोलण्याचे रेकॉर्डिंग केले होते. रेकॉर्डींग ऐकल्यावर संतप्त पालकांनी अभिजीतला महाविद्यालयात गाठले. यानंतर त्याच्या तोंडाला काळे फासत पोलीस ठाण्यापर्यंत त्याची धिंड काढली.
‘महाविद्यालयात शिक्षिण घेणाऱ्या मुलीला मार्क वाढवून देतो, त्याशिवाय विविध आमिष दाखवून संबंधित लिपीकाने मुलीचा विनयभंग केला होता. याप्रकरणी पालकांनी संबंधीत शिक्षकास पोलीस ठाण्यात आणले होते. त्यांची तक्रार दाखल करुन लिपीकाविरूद्ध विनयभंग व इतर कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…
शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…
NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…
गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर सातारा : पुणे विभाग…
ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…
ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर १०० टक्के विजयी होणार मिरज – राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक…