पदभार स्वीकारल्यापासून वादग्रस्त ठरेलले पंढरपुर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रविकिरण घोडके याना या पदाच्या जबाबदारीतून कार्यमुक्त करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे पंढरपूर पंचायत समितीमधील एकाधिकारशाहीने चालणारा कारभार संपुष्ठात येईल अशी भावना व्यक्त केली जात आहे.पदमुक्त बीडीओ रविकिरण घोडके यांनी पदभार घेतल्यापासूनच मनमानी कारभार करीत असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात येऊ लागला होता.
रविकिरण घोडके याना पदमुक्त केल्यानंतर सहाय्यक गटविकास अधिकारी सुरेंद्र पिसे यांच्याकडे तात्पुरता पदभार सोपविण्यात आला आहे.करकंब ग्रामपंचायत मधील विरोधी गटाने कालपासून पंचायत समितीच्या प्रवेशदारात आमरण उपोषणास सुरुवात केली होती.यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य रजनी देशमुख यांनी रविकिरण घोडके यांच्यावर गंभीर आरोप करीत त्यांच्याकडे केलेल्या तक्रारीची दखल घेतली नसल्यामुळेच हे उपोषण करावे लागत असल्याचे सांगितले होते.तर काही दिवसापूर्वी कासेगाव जिल्हा परिषद गटाचे सदस्य वसंत देशमुख यांनीही रविकिरण घोडके हे मनमानी पद्धतीने काम करत असून पंचायत समिती सभापती व उपसभापती यांनीही कारवाईची मागणी केल्याचे निदर्शनास आणून दिले होते.
या गंभीर बाबीची दखल घेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी घोडके याना अखेर पदमुक्त केले आहे.
मात्र खुलासा करताना रविकिरण घोडके यांनी आपण १२ ते १४ जुलै या तीन दिवसाच्या कालावधीची रजा घेतली होती व ती पुढे वाढिवण्यात यावी अशी विनंती केली होती त्यास अनुसरून तात्पुरता पदभार सहाय्यक गटविकास अधिकारी यांच्याकडे सोपविण्यात आल्याचे पत्राची प्रत माहितीसाठी पंढरी वार्तास पाठविली आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…