महाड: नदीवरील पुलावरून पुराचे पाणी वाहत असताना देखील पुलावरून एसटी बस नेत प्रवाशांचा जीव धोक्यात घालणाऱ्या एसटी चालकाला आणि वाहकाला निलंबित करण्यात आले आहे. रायगड जिल्हा परिवहन मंडळाने ही कारवाई केली आहे. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील रेवतळे फाट्याजवळ सोमवारी ही घटना घडली.विजयकुमाक रामचंद्र जाधव असे प्रवाशांचा जीव धोक्यात घालणाऱ्या एसटी वाहकाचे नाव आहे. तर, अशोक लक्ष्मण दराडे असे वाहकाचे नाव आहे.
सोमवारी, 12 जुलै रोजी पिंपरी-चिंचवड डेपोची MH-14 BT-4578 या क्रमांकाच्या एसटी बस घेऊन हे दोघे रेवतळे फाट्याहून वेळासकडे जात होते. या एसटीमध्ये एकूण ५२ प्रवासी होते.वेळासकडे जाताना (रत्नागिरी) ही एसटी महाड तालुक्यातील रेवतळे फाटा येथे आली असता नागेश्वरी बंधारा आणि खाडीपट्ट्याकडे जाणारा रस्ता ओव्हरफ्लो झाला होता. संपूर्ण रस्ता पाण्याखाली गेला होता.
अशी स्थिती असतानाही एसटी चालकाने धोका पत्करून गाडी पुढे रेटली आणि वाहणाऱ्या पाण्यातून मार्ग काढला.प्रवाशांचा जीव धोक्यात घालणाऱ्या या घटनेची माहिती मिळताच या एसटीचे चालक आणि वाहक अशा दोघांना निलंबित करण्यात आले.ही माहिती रायगड जिल्हा परिवहन मंडळाच्या विभाग नियंत्रक अनघा बारटक्के यांनी दिली.
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…