मागील तीन-चार दिवसांत पावसाने राज्यातील विविध भागात दमदार हजेरी लावली आहे. पुढील पाच दिवस महाराष्ट्रात सर्वत्र चांगला पाऊस पडेल असा अंदाज आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी अतिवृष्टीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर मराठवाड्यातील काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
या जिल्ह्यांना रेड अलर्ट
आज आणि उद्या पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा आणि कोल्हापूरमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
या जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबईच्या धरण क्षेत्रात पुढील तीने ते चार दिवस चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
सलग तीन दिवसांपासून पुणे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पावसानं जोरदार हजेरी लावली होती. आज घाट परिसरातील पुण्यासह सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. या ठिकाणी वेगवान वाऱ्याच्या साथीनं विजांचा गडगडाट होणार आहे.
पुढील 3 तासात या जिल्ह्यात मुसळधार
हवामान खात्याच्या सुधारित अंदाजानुसार, पुढील तीन तासांत पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, नंदूरबार आणी बीड या जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान 30 ते 40 किमी प्रतितास वेगानं वारा वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचा सल्ला हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…