ताज्याघडामोडी

रेशन दुकानातून वितरित होणार तांदूळ निकृष्ट असल्याच्या तक्रारी नाहीत

अन्न नागरी पुरवठा विभागामार्फत लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत राज्यात उत्कृष्ट दर्जा असलेल्या तांदळाचे वितरण केले जात आहे.राज्यात निकॄष्ट दर्जाचा, भेसळयुक्त तसेच खडे अथवा कचरा मिश्रीत असलेला तांदूळ वाटप झाल्याच्या कोणत्याही तक्रारी या विभागाला मिळालेल्या नाहीत, अशी माहिती अन्न नागरी पुरवठा विभागामार्फत  प्रसिद्धीस देण्यात आली आहे.

विकेंद्रित धान खरेदी योजना ही केंद्र शासनाची योजना असून त्यामध्ये राज्यातील शेतकऱ्यांकडून किमान आधारभूत किंमतीने धानाची खरेदी केली जाते. या धानाची भरडाई करून सरासरी गुणवत्ता दर्जाचा (FAQ) तांदूळ भरडाई करणाऱ्या मीलरकडून तपासणी करून स्वीकारला जातो. हा तांदूळ सद्यस्थितीत लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत नागपूरसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वाटप केला जात आहे. निश्चित केलेल्या गुणवत्तेनुसार जर मिलरने तांदूळ दिला नाही तर तो ताबडतोब बदलून घेतला जातो.

कोणत्याही परिस्थितीत लाभार्थ्याना निकॄष्ट दर्जाचा, भेसळयुक्त तांदूळ वाटप केला जाणार नाही याची यंत्रणेकडून दक्षता घेण्यात येते. तसेच नजिकच्या काळात नागपूर जिल्ह्यातून अथवा राज्यातील अन्य जिल्ह्यांतून निकॄष्ट दर्जाचा, भेसळयुक्त तसेच खडे अथवा कचरा मिश्रीत असलेला तांदूळ वाटप झाल्याच्या तक्रारी प्राप्त झालेल्या नाहीत. सद्यस्थितीत अनेक जिल्ह्यांसाठी भारतीय अन्न महामंडळाकडून तांदळाची उचल केली जात नाही तसेच मिलरकडून तांदूळ घेताना गुणवत्ता तपासणी करून लाभार्थ्यांना वाटपासाठी तांदूळ उपलब्ध केला जात आहे. लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना विहित केलेल्या परिमाणात तांदळाचे वाटप केले जात आहे. तांदळाचा काळाबाजार केल्याची बाबदेखील नजिकच्या काळात निदर्शनास आलेली नाही.

नवी मुंबईमध्ये जुलै व ऑगस्ट, 2020 मध्ये  पनवेल तालुक्यात अवैध साठवणूक केलेला तांदूळ शासन जमा करण्यात आला होता.  हा तांदूळ महाराष्ट्र राज्यातील नसून कर्नाटक राज्याच्या लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील असल्याचे व तो इतर देशात निर्यातीसाठी आणला असल्याचे तपासाअंती निष्पन्न झाले. नियमानुसार पनवेल तालुक्यातील रास्तभाव दुकानदारांमार्फत लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थ्यांना या तांदळाचे वाटप करण्यात आले आहे, असे एका पत्रकाद्वारे अन्न व नागरी पुरवठा विभागाने प्रसिद्धीस दिले आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सांगली जिल्ह्यात ज्ञानयात्री डॉ.बी.पी. रोंगे सरांना उत्स्फूर्त प्रतिसाद

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर १०० टक्के विजयी होणार मिरज – राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक…

6 hours ago

माढा तालुक्यात फक्त डॉ. रोंगे सरांचीच हवा | ज्ञानयात्रींच्या विचारांना शिक्षकांकडून हिरवा कंदील

कुर्डुवाडी- राहिलेल्या कमी अवधीत जास्त शिक्षकांशी संवाद साधता यावा आणि ज्ञानयात्री डॉ. रोंगे सरांचे विचार…

1 day ago

इचलकरंजी परिसरात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला वेग; शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

डीकेटीई संस्थेच्या ४०० हून अधिक शिक्षकांचा मेळावा; कार्यकारी संचालक रवी आवाडे यांच्याकडून ठाम पाठिंबा इचलकरंजी…

1 day ago

शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांना सांगली जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांचा सांगली-मिरज परिसरात प्रचार दौरा; शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद…

1 day ago

स्वेरी फार्मसीमध्ये राष्ट्रीय औषधनिर्माण सप्ताह उत्साहात साजरा

संस्थापक डॉ.बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर उपक्रम संपन्न पंढरपूर : गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री…

2 days ago

रयत शिक्षण संस्थेच्या शिक्षकांच्या प्रश्नांना न्याय

ज्ञानयात्री डॉ. बी. पी. रोंगे सरांच्या कार्याची शिक्षकवर्गात चर्चा टेंभुर्णी: शिक्षकांचे प्रश्न समजून घेणे, त्यांचा…

3 days ago