पंढरपुर तालुक्यातील भीमा नदीच्या काठावरील काही गावांमध्ये होत असलेल्या वाळू चोरीच्या घटना पोलीस कारवाई मुळे सातत्याने उजेडात येत असून वेळोवेळी गुन्हे दाखल होऊन देखील वाळू चोरी काही थांबत नाही असेच म्हणावे लागेल.पंढरपूर तालुक्यातील शेगाव दुमाला हद्दीतील भीमा नदी काठावरून होत असलेल्या अवैध वाळू उपशावर पंढरपुर तालुका पोलीस ठाण्याकडून अनेकवेळा कारवाई झाली आहे मात्र तरीही अधून मधून संधी साधत वाळू चोरीचा प्रयत्न सुरूच असल्याचे ११ जुलै रोजी भल्या पहाटे झालेल्या कारवाई वरून स्पष्ट होत आहे.
या बाबत पोलीस नाईक अशोक दगडू भोसले यांनी तालुका पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीनुसार दि.11/06/2021 रोजी पहाटे 05/30 वा.चे सुमारास फिर्यादी पोलीस नाईक अशोक भोसले यांच्यासह पो.हे.कॉ. नलावडे,पो.हे.कॉ. शिंदे हे मौजे शेगाव दुमाला शिवारात पेट्रोलींग करित असताना आम्हाला बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की,मौजे शेगाव दुमाला ता.पंढरपुर येथील भीमानदीचे पात्रातून एक ट्रक्टर चोरून वाळू घेवुन शेगाव दुमाला ते तीन रस्ता चौकाकडे कच्या रोडने येत आहे. सदर माहिती मिळताच तीन रस्ता ते शेगाव दुमाला कच्या रोडने जात असताना पोलिसांना समोरून एक ट्रक्टर येत असताना दिसला असता सदर ट्रक्टर चालकास थांबण्याचा इशारा केला त्याचा ट्रक्टर रोडवर थांबविला तेंव्हा सदर ट्रक्टर जवळ जावुन पाहणी केली असता एक लाल रंगाचा समोरील नंबर खोडलेला स्वराज 855कंपनीचा ट्रक्टर व त्यास पाठीमागे एक लाल रंगाची बिगर नंबरची डंपिंग ट्रली व त्यामध्ये एक ब्रास वाळु भरलेली दिसुन आली.सदर ट्रक्टर चालकास त्याचा नाव पत्ता विचारता त्याचे नाव रमेश मोहन साळुंखे वय 45 वर्ष रा.शेगाव दुमाला असल्याचे सांगण्यात आले.
सदर कारवाईत ट्रक्टर, ट्रली व त्यामधील वाळु जप्त केली आहे त्याचे वर्णन खालीलप्रमाणे.1) 3,08,000/- रू किंमतीचा एक लाल रंगाचा स्वराज कंपनीचा 855मडेलचा समोरील नंबर खोडलेला ट्रक्टर त्याचा चेसी नं.QZCH51618019353व इंजिन नं.47.1403/SLH2377 असा असलेला व त्यास पाठीमागे डलेली लाल रंगाची बिगर नंबरची डंपिंग ट्रली व त्यामध्ये एक ब्रास वाळु असा अंदाजे ३ लाख ८ हजाराचा मुद्देमाल जप्त करून भा.दं.वि. कलम379सह गौण खनिज कायदा 1978 चे कलम 4(1),4(क)(1) व 21 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.