वर्षभरापूर्वी लग्न झालेल्या विवाहतेच्या लग्नाआधी सोबत काढलेले फोटो तुझ्या नवऱ्याच्या व्हाट्सअपवर पाठवेल अशी सतत धमकी देत होता. या सततच्या धमक्यांना कटाळून विवाहतेने अधिक प्रमाणात गोळ्यांचे सेवन करून आत्महत्या केली. उपचारादरम्यान 2 जुलै रोजी मृत्यू झाला. आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेली चिठ्ठी आणि गोळ्या घेतल्याचा व्हिडिओ समोर आल्याने सातारा ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मयत शिक्षिकेचा विवाह वर्षभरापूर्वीच झाला होता. लग्नाआधी आरोपी मित्र होता व तो सतत कॉल करायचा आपले फोटो तुझ्या पतीच्या व्हाट्सअपवर पाठवून देईल तुला बरबाद करेल अशा धमक्या तिला सतत द्यायचा. या त्रासाला कंटाळून तिने 1 जुलै रोजी बीपीच्या गोळ्या जास्त प्रमाणात घेतल्या. आणि कोणालाही सांगितले नाही. काही वेळाने ती स्वयंपाक करायला किचनमध्ये गेली असता तिथे चक्कर येऊन पडली.
नातेवाईकांनी तिला शिवाजीनगर येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यांनतर अधिक उपचारासाठी आकाशवाणी चौकातील खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. तेथे उपचार सुरू असतांना तेथे उपचार सुरू होते, मात्र तिथल्या डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे तिला शिवाजीनगर येथील आनंदी हॉस्पिटलमध्ये 2 जुलै रोजी परत दाखल केले. तेव्हा तिची प्रकृती अधिकच खालावली होती. आणि उपचारा दरम्यान दुपारी 2 वाजता तिचा मृत्यू झाला डॉक्टरांनी सांगितले.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…