मुंबई: राज्याचे विशेष सरकारी वकील अॅ. उज्ज्वल निकम यांनी शिवसेनेत प्रवेश करावा, यासाठी जोरदार प्रयत्न सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. जळगाव दौऱ्यावर असलेले नगरविकासमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी शनिवारी अॅ.उज्ज्वल निकम यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. अॅ. उज्ज्वल निकम आणि एकनाथ शिंदे यांच्यात बंद दाराआड बराचवेळ चर्चाही सुरु होती.
या चर्चेचा नेमका तपशील अद्याप समोर आलेला नाही. मात्र, त्यामुळे उज्ज्वल निकम शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात जोर धरला आहे.विशेष म्हणजे गेल्या महिन्यात जळगाव दौऱ्यावर असताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही उज्ज्वल निकम यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता पुन्हा एकनाथ शिंदे अॅ. उज्वल निकम यांना भेटल्याने शिवसेनेकडून जोरदार प्रयत्न सुरु असल्याचे स्पष्ट झाले आहे.
यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही अॅ. उज्ज्वल निकम यांना राजकारणात येण्याची ऑफर दिली होती. राष्ट्रवादी काँग्रेसकडून अॅ. उज्वल निकम यांना राज्यसभेवर पाठवण्याचा मानस होता. मात्र, अॅ. उज्ज्वल निकम यांनी हा प्रस्ताव दोनवेळा नाकारला होता. आतादेखील उज्वल निकम यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यास त्यांना पक्षातर्फे राज्यसभेवर पाठवले जाऊ शकते. तसेच चोपडा विधानसभा मतदारसंघाचे आरक्षण उठल्यास तिकडून निवडणूक लढवण्याचा पर्यायही उपलब्ध होऊ शकतो, अशी सूत्रांची माहिती आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…