ताज्याघडामोडी

हत्येसाठी गुगल मॅपची घेतली मदत; लग्नाच्या अवघ्या 15 दिवसात तरुणीने पतीला संपवलं

भोपाळ, 10 जुलै : मध्य प्रदेशातील विदिशा जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे लग्नाच्या अवघ्या 15 दिवसात नवविवाहितीने पतीची हत्या केली आहे. यासाठी तिने चार वर्षांपासून प्रेमसंबंध असलेल्या प्रियकराची मदत घेतली. मिळालेल्या माहितीनुसार, विदिशातील लाटेरी तहसीलच्या मलिया खेडी गावात ही घटना घडली. पत्नी कृष्णा बाईने पतीची हत्या केल्याचं पोलिसांच्या तपासात उघड झालं आहे.

तिने प्रियकर शुभम याच्या मदतीने पतीची हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री नवविवाहित जोडपं झोपलं होतं. त्यावेळी पत्नीने डाव साधत पतीला संपवलं. पत्नीने हत्येदरम्यान आपण बेशुद्ध झाल्याचा पोलिसांना जबाब दिला होता. मात्र पोलिसांना सुरुवातीपासूनच पत्नीवर संशय होता. पत्नीने पतीचे दोन्ही हात धरले आणि प्रियकराने पतीवर कुऱ्हाडीने वार करत त्याची हत्या केली. 

लग्नाच्या 15 दिवसांनंतर नवविवाहित महिलेने पतीची निघृणपणे हत्या केली. महिला एक दिवसापूर्वीच सासराच्या घरी आली होती. गेल्या चार वर्षांपासून पत्नीचे शुभम नावाच्या मुलावर प्रेम होते. आणि याच त्याची तिने पतीचा जीव घेतला. पत्नीने हत्येचा बनाव रचला आणि प्रियकराला फोन करून बोलावून घेतलं. यानंतर प्रियकर बाईक घेऊन आला. त्याने बाईकलाच कुऱ्हाड बांधली होती. गुगल मॅपच्या मदतीने प्रियकराने प्रेयसीचं घर गाठलं होतं. त्यानंतर दोघांनी मिळून ही हत्या घडवून आणली.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

6 days ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

1 week ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 weeks ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

3 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

3 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

4 weeks ago