दोनपेक्षा जास्त अपत्यं असणाऱ्या पालकांना सरकारी नोकरी आणि सरकारी योजनांपासून वंचित राहावं लागू शकतं. उत्तर प्रदेशमध्ये ‘टू चाईल्ड पॉलिसी’ची घोषणा रविवारी होईल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. रविवारी आंतरराष्ट्रीय लोकसंख्या नियंत्रण दिवसाचं निमित्त साधून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ही घोषणा करण्याची शक्यता आहे.
काय आहे योजना?
वाढत्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी या योजनेची अंमलबजावणी करण्याचं उत्तर प्रदेश सरकारनं निश्चित केलं आहे.
यासाठी उत्तर प्रदेशच्या राज्य विधी आयोगानं यासाठीचं विधेयक तयार केलं असून त्याचा पहिला मसुदा तयार आहे. त्यात दोनपेक्षा अधिक अपत्यं असणाऱ्या पालकांना सरकारी नोकरी आणि सरकारी योजना यांचे लाभ न देण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्याचप्रमाणं वेगवेगळ्या सरकारी भत्त्यांवरही अशा पालकांना पाणी सोडावं लागण्याची शक्यता आहे.
दोन अपत्यांबाबतच्या कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढता येणार नाहीत, अशीदेखील तरतूद या मसुद्यात करण्यात आली आहे. प्रत्येक कुटुंबातील जास्तीत जास्त चारच व्यक्तींचं नाव रेशन कार्डवर घालता येणार असून एकूण 77 योजनांपासून अशा नागरिकांना वंचित राहावं लागणार आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…