स्टेट बँक इंडिया पाठोपाठ आता आणखी एका बँकेच्या नियमांमध्ये मोठे बदल झाले आहेत. देशातील प्रमुख खासगी बँकांपैकी एक असणाऱ्या आयसीआयसीआय बँकेने ATM, चेकबुक आणि पैसे काढण्याच्या शुल्कात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील महिन्यापासून सुधारित नियम लागू होतील. हे नियम बचत खाते आणि सॅलरी खाते दोन्हींसाठी बंधनकारक असतील.
ICICI बँकेच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार, येत्या महिनाभरात मुंबई, नवी दिल्ली, हैदराबाद, चेन्नई, कोलकाता आणि बंगळुरू या सहा महानगरांमध्ये बँकेचे पहिले तीन व्यवहार नि:शुल्क असतील.उर्वरित ठिकाणी ही मर्यादा पाच व्यवहारांची असेल. त्यानंतर प्रत्येक आर्थिक व्यवहारासाठी प्रत्येकी 20 रुपये आणि इतर व्यवहारांसाठी 8.50 रुपयांचे शुल्क आकारले जाईल. ICICI बँकेच्या सिल्व्हर, गोल्ड, मॅग्नम, टायटेनियम आणि वेल्थ कार्डधारकांसाठी हे शुल्क लागू असेल.
तसेच होम ब्रांचच्या ATM मधून फक्त चारवेळा पैसे मोफत काढता येतील. त्यापुढील व्यवहारांसाठी 150 रुपये शुल्क आकारले जाईल. तसेच दुसऱ्या शाखेशी 25000 रुपयांपर्यंत नि:शुल्क आर्थिक व्यवहार होऊ शकतात. मात्र, त्यानंतर प्रत्येकी हजार रुपयांच्या व्यवहारावर पाच रुपये शुल्क आकारले जाईल.एका वर्षात 25 पानी चेकबुक नि:शुल्क मिळेल. त्यानंतर 10 पानी चेकबुकसाठी प्रत्येकी 20 रुपयांचे शुल्क आकारले जाईल.ICICI बँकेच्या बचत आणि सॅलरी अकाऊंटधारकांना प्रत्येक महिन्यात चार आर्थिक व्यवहार नि:शुल्क असतील. त्यानंतर प्रत्येकी 1000 रुपयांच्या व्यवहारासाठी 5 रुपयांचे शुल्क आकारले जाईल.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…