अवैध वाळू उपसा करण्यास विरोध करणाऱ्या शेतकऱ्यास बेदम मारहाण

पंढरपूर तालुक्यातील तपकिरी शेटफळ हद्दीतून माण नदीकाठावरून अवैध वाळू उपसा होत असल्याचे प्रकार गेल्या काही महिन्यात सातत्याने निदर्शनास आले असून नदीकाठी शेती असणाऱ्या शेतकऱ्यांनाही या अवैध वाळू उपसा करणाऱ्याचा मोठा त्रास सहन करावा लागत असल्याची चर्चा सातत्याने होताना दिसून येते.अवैध वाळू साठा अथवा वाळू उपसा करण्यास वाट देणाऱ्या शेतकऱ्यावर महसूल विभागाकडून दंडात्मक कारवाई करण्यात येत असल्याने नदीकाठी शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळेला आपल्या शेतजमिनीच्या हद्दीत अवैध वाळू उपसा होत नाही ना यासाठी डोळ्यात तेल घालून काळजी घ्यावी लागत आहे.तर शेतकऱ्याने विरोध केल्यास त्याला अवैध वाळू उपसा करणाऱ्याकडून दमदाटी अथवा मारहाण यालाही सामोरे जावे लागत आहे.
   असाच एक प्रकार पंढरपूर तालुक्यातील तपकिरी शेटफळ येथे घडला असल्याचे पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीनुसार समोर येत असून  लक्ष्मण जकाप्पा माने वय 24 वर्षे धंदा-शेती जात-धनगर रा.तपकिरी शेटफळ ता.पंढरपुर यांनी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीनुसार तपकिरी शेटफळ गावातील समाधान सुखदेव माने व आप्पा मधु मासाळ हे फिर्यादीच्या शेतालगत असलेल्या माण नदीपात्रातुन चोरुन वाळु काढत असल्याने व फिर्यादीच्या घरासमोरिल वाटेन वाळू वाहतूक करत असल्याने फिर्यादीने वाळुची वाहने घेऊन जात असताना त्यांना आडविले होते.तेव्हापासुन ते चिडुन होते.दिं.08/07/2021 रोजी दुपारी 02/00 वाचे सुमारास समाधान सुखदेव माने रा.तपकीरी शेटफळ याने फोन करुन तुझेकडे काम आहे,तु आमचे शेताजवळील नळावर ये असा फोन केल्याने फिर्यादी त्याचे शेताजवळील पाण्याचे कँनलजवळगेला असतागावातील 1) समाधान सुखदेव माने 2)संजय सुखदेव माने 3) आप्पा मधु मासाळ 4) पांडुरंग सदाशिव मेटकरी असे होते त्यावेळी समाधान सुखदेव माने याने फिर्यादीस तु आमची वाहन का आडवत असतो.तु आम्हास तुझे शेताजवळुन माण नदीपात्रातुन वाळु का काढुन देत नाही असे म्हणुन शिवीगाळी करण्यास सुरु करुन त्या सर्वांनी तुला आता जिवंत ठेवत नाही असे म्हणुन 1) समाधान सुखदेव माने याने त्याचे हातातील लोखंडी गजाने मला मारण्यास सुरुवात केली त्याचे हातातील लोखंडी गज माझे डोकीत लागुन जखम झाली आहे.तसेच 2) संजय सुखदेव माने याने त्याचे हातातील लोखंडी सळईने हातावर ,दंडावर मारुन मुक्का मार दिला आहे.3)तसेच आप्पा मधु मासाळ याने त्याचे हातातील काठीने पाठीवर मारुन मुक्का मार दिला आहे.4) पांडुरंग सदाशिव मेटकरी याने त्याचे हातातील काठीने मांड्यावर,पायाच्या पिंडरीवर ,खांद्यावर मारुन मुक्का मार दिला आहे.तसेच समाधान सुखदेव माने याने माझे जवळ असलेला फिर्यादीचा ओपो कंपनीचा मोबाईल ,तसेच गळ्यातील दोन ग्रँम वजनाचे बदाम,व दहा हजार तीनशे रुपये हिसकावुन घेतले .
सदर प्रकरणातील फिर्यादी यास पंढरपूर शहरातील अपेक्स हॉस्पिटल येथे पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले असून या प्रकरणी वरील चारही व्यक्ती विरोधात पंढरपूर तालुक्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

6 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago