पंढरपुर तालुक्यातील फुलचिंचोली येथील एक ५५ वर्षीय महिला दिंनाक 30/06/2021 रोजी सकाळी 11/30 च्या सुमारास गावातीलच एका ब्युटी पार्लर मध्ये गेलेली असताना सदर महिलेच्या पर्समधून सोन्याचे दागिने हातोहात लंपास केल्याची घटना घडली असून या प्रकरणी सेवा निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याची पत्नी असलेल्या सदर महिलेने पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
या बाबत दाखल फिर्यादीनुसार सदर फिर्यादी महिला गावातीलच एका ब्युटी पार्लर मध्ये फेशियल करण्यासाठी गेल्या असता त्यांनी कानातील सोन्याचे डायमंड असलेले फुले व त्यास असलेल्या साखळ्या लहान पाकिटात ठेऊन ते पाकीट सोबत आणलेल्या मोठ्या पिशवीत ठेवले तसेच गळ्यातील मंगळसुत्र,चैन आणि मोबाईल असे सोबत आणलेल्या त्याच मोठ्या पिशवीत ठेवले.व हि पिशवी पार्लर काम करण्याच्या मागील बाजुस असलेल्या सोफ्यावर ठेवली होती.फेशियल सुरु असतानाच पिशवीत ठेवलेला मोबाईलची रिंग वाजली असता फेशियल करणाऱ्या मुलीस मागे सोफ्यावर ठेवलेल्या पिशवीतून मोबाईल देण्यास सांगितले त्यानंतर सदर महिला पार्लर मधील कोपऱ्यात मोबाईल वर बोलत थांबली असता त्यांना सोफ्यावर ठेवलेली आपली पिशवी कोणीतरी उचकटून दागिने असलेले पाकीट बाहेर आलेले दिसले.जाऊन काहीवेळाने त्यांनी पिशवी व त्यात ठेवलेले लहान पाकीट तपासले असता सोन्याचे डायमंड असलेले फुले व कानातील सोन्याचे साखळ्या मिळुन आल्या नाहीत ब्युटी पार्लरमधील मुली व महिलांकडे विचारणा केली असता दागिने पाहिले नसल्याचे त्यांनी सांगितले.सदर प्रकरणीं त्यांनी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.