ताज्याघडामोडी

जिल्हाधिकारी शंभरकर यांच्याकडून वाखरी पालखी तळ, विसावा मंदीराची पाहणी

जिल्हाधिकारी शंभरकर यांच्याकडून

वाखरी पालखी तळ, विसावा मंदीराची पाहणी

    पंढरपूर, दि.08:-आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज वाखरी येथील पालखी तळ , विसावा मंदीर, प्रदक्षिणा मार्ग, चंद्रभागा नदीपात्र, घाट तसेच मंदिराची  पाहणी केली.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते ‌अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, प्रांताधिकारी सचिन ढोले, मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी आदी उपस्थित होते.

वाखरी पालखी तळाला बॅरेकेटींग करणे, पालखी तळाची स्वच्छता राखणे, अखंडीत विद्युत पुरवठा, पाणी पुरवठ्याची व्यवस्था करावी. पालखी तळावर तात्पुरती विसावा व्यवस्था व मंडप टाकावा. तात्पुरते स्वच्छतागृह उभारावीत, पोलीस प्रशासनाने पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवावा, अशा सूचना जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिल्या.

 सार्वजनिक बांधकाम विभागाने आवश्यक ठिकाणी मुरमीकरण करावे तसेच पालखी तळावर पाणी साठणार नाही याची दक्षता घ्यावी. ग्रामपंचायत प्रशासनाने वाखरी पालखी तळ स्वच्छ राहिल याची दक्षता घ्यावी, असे जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सांगितले.

चंद्रभागा नदीपात्र स्वच्छ राहील याची दक्षता घ्यावी. प्रदक्षिणा मार्गावरील रस्त्याची डागडुजी करावी. कोरोनाच्या  पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, अशा सूचना श्री. शंभरकर यांनी दिल्या.                               

यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सुरक्षेच्या दृष्टीने पालखीतळावर करण्यात येणाऱ्या नियोजनाची माहिती दिली. प्रांताधिकारी ढोले यांनी प्रशासनाकडून करण्यात आलेल्या  तयारीची माहिती दिली. मंदिर समितीच्या वतीने पालख्यांचे स्वागत व शासकीय महापूजेबाबत करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली.

यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रदीप ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शीतलकुमार जाधव,तहसिलदार सुशिल बेल्हेकर,  गटविकास अधिकारी रविकिरण घोडके,  मुख्याधिकारी अरविंद माळी, सरपंच कविता पोरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री.गुंड यांच्यासह संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी एसक्यूएल प्रशिक्षण; ७५ हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…

5 days ago

साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला वेग; डॉ. श्रुती जोशी यांच्या नेतृत्वाखाली सदिच्छा भेटींचा धडाका!

शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…

1 week ago

शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांचा निर्धार; प्राध्यापकांचे रोजगारहित आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य

NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…

1 week ago

विजयादशमीच्या मुहूर्तावर साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात!

गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर   सातारा : पुणे विभाग…

2 weeks ago

सांगोला तालुक्यात डॉ.बी.पी. रोंगे सरांचा दबदबा

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…

2 weeks ago

सांगली जिल्ह्यात ज्ञानयात्री डॉ.बी.पी. रोंगे सरांना उत्स्फूर्त प्रतिसाद

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर १०० टक्के विजयी होणार मिरज – राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक…

2 weeks ago