ताज्याघडामोडी

सर्व विभागांनी समन्वय ठेवून काम करावे जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांच्या सूचना

सर्व विभागांनी समन्वय ठेवून काम करावे

जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांच्या सूचना

       पंढरपूर, दि.08: कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन करतानाच परंपरा कायम राहील याअनुषंगाने सर्व विभागांनी समन्वय ठेवून काम करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज येथे दिल्या.           

          जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज आषाढी वारीच्या नियोजनाबाबत सर्व संबंधित विभाग प्रमुखांची बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. गोपाळपूर येथील स्वेरी संस्थेच्या सभागृहात ही बैठक झाली.

   बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, प्रांताधिकारी सचिन ढोले आदी उपस्थित होते.                  

       बैठकीच्या सुरवातीला श्री. ढोले यांनी शासनाने दिलेल्या निर्देशानुसार पालखी सोहळे यांचे आगमन, शासकीय महापूजा,  नगर प्रदक्षिणा आदीबाबतचे नियोजन सांगितले.              

                   श्री. शंभरकर यांनी शासनाने आषाढी वारीबाबत अतिशय स्पष्ट सूचना दिल्या आहेत. या सर्व सूचनांचे काटेकोर पालन करण्यासाठी प्रत्येक विभागप्रमुखांनी नेमून दिलेल्या जबाबदारीची अंमलबजावणी करावी. विशेषतः  सार्वजनिक आरोग्य विभाग, पंढरपूर नगर परिषद, महावितरण, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा विभाग यांच्या विभागप्रमुखांनी एकमेकांच्या संपर्कात रहावे. आषाढीवारी सोहळा नेटकेपणाने आणि कोरोना विषयक नियमांचे पालन होईल याची दक्षता घ्यावी, अशा सूचना दिल्या.

                 मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतल कुमार जाधव,तहसिलदार सुशिल बेल्हेकर, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, मुख्याधिकारी अरविंद माळी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री.गुंड यांच्यासह संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी एसक्यूएल प्रशिक्षण; ७५ हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…

5 days ago

साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला वेग; डॉ. श्रुती जोशी यांच्या नेतृत्वाखाली सदिच्छा भेटींचा धडाका!

शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…

1 week ago

शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांचा निर्धार; प्राध्यापकांचे रोजगारहित आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य

NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…

1 week ago

विजयादशमीच्या मुहूर्तावर साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात!

गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर   सातारा : पुणे विभाग…

2 weeks ago

सांगोला तालुक्यात डॉ.बी.पी. रोंगे सरांचा दबदबा

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…

2 weeks ago

सांगली जिल्ह्यात ज्ञानयात्री डॉ.बी.पी. रोंगे सरांना उत्स्फूर्त प्रतिसाद

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर १०० टक्के विजयी होणार मिरज – राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक…

2 weeks ago