ताज्याघडामोडी

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या पंढरपूर अध्यक्षपदी प्रविण नागणे यांची निवड कोरोना योद्धा पुरस्कार मिळाल्याबद्दल जेष्ठ महेश खिस्ते यांचा सन्मान

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या पंढरपूर अध्यक्षपदी प्रविण नागणे यांची निवड
कोरोना योद्धा पुरस्कार मिळाल्याबद्दल जेष्ठ महेश खिस्ते यांचा सन्मान
पंढरपूर प्रतिनिधी:महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची पंढरपूर शहर व तालुका कार्यकारणी निवड बैठक काल पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष राजेंद्र कोरके पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.यावेळी पंढरपूर अध्यक्षपदी प्रवीण नागणे तर कार्याध्यक्षपदी सुरेश गायकवाड यांची एकमताने निवड करण्यात आली.तसेच उपाध्यक्षपदी नागेश आदापुरे,अमर कांबळे व रामदास नागटिळक यांची निवड करण्यात आली.तर सचिव म्हणून कुमार कोरे यांची निवड करण्यात आली.तर प्रसिद्धी प्रमुख म्हणून नेताजी वाघमारे,खजिनदारपदी रवींद्र कोळी, सहखजीनदारपदी संजय यादव,तर मार्गदर्शक म्हणून जेष्ठ पत्रकार राजकुमार घाडगे,विवेक बेणारे यांची निवड करण्यात आली.तसेच कार्यकारणी सदस्य म्हणून संतोष रणदिवे,राधेश बादले पाटील,राजरत्न बाबर,अमोल अभंगराव, तानाजी जाधव,संजय ननवरे,धनाजी राक्षे,गोपीनाथ देशमुख,शहाजी काळे,विश्वनाथ केमकर,नामदेव लकडे,बालम मुलाणी यांची निवड करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या कामकाजाविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली.पंढरपूरचे जेष्ठ पत्रकार महेश खिस्ते यांना राज्यस्तरीय कोरोना योद्धा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने सन्मान करण्यात आला.
     महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे संघटन वाढविणे तसेच पत्रकारांच्या अडचणी सोडविण्यासाठी सविस्तर चर्चा यावेळी करण्यात आली.निवडीवेळी अनेक पत्रकार उपस्थित होते.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

6 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago