शेतीला जोडधंदा म्हणून ग्रामीण भागात दुग्ध व्यवसाय भरभराटीस आला,पंढरपुर तालुक्यात चाळीस वर्षांपूर्वी पंढरपुरी म्हशी आणि गौळारू गायीच दुग्ध व्यवसायासाठी महत्वपूर्ण समजल्या जात होत्या.मात्र पुढे अधिकाधिक दुग्ध उत्पादन झाले पाहिजे यासाठी आग्रह धरला जाऊ लागला आणि त्यातूनच जर्सी गायीचे युग सुरु झाले.आणि आपल्याच गोठ्यातील गाय गावात सर्वात जास्त दूध देते हे दाखवून देण्याची चढाओढ लागली.मात्र कधी कधी यातूनच वादाचे प्रसंगही घडले असून असाच एक प्रकार पंढरपुर तालुक्यातील मगरवाडी येथे घडला असल्याचे पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीनुसार दिसून येत आहे.
या बाबत मिळालेल्या माहितीनुसार पंढरपूर तालुक्यातील मगरवाडी येथील शेतकरी विशाल ब्रम्हदेव यावले यांनी आपली जर्सी गाय काही दिवसापूर्वी तारापूर येथील साडू विकास संजय निकम रा-तारापुर ता-पंढरपुर यास ४६ हजार रुपयास विकली होती.दिनांक ५ जुलै रोजी विकास संजय निकम यांने फिर्यादीस फोन करुन तुझ्या कडुन घेतलेली जर्शी गाय दुध कमी देत आहे.काय करायचे.असे विचारले त्यावर फिर्यादीने त्यास तु गाय दीड महिन्यापुर्वी घेवुन गेला तु आता मला सांगतो काय असे सांगत फोन ठेवला.या घटनेनंतर फिर्यादीचे साडू विकास निकम यांनी फिर्यादी विशाल ब्रम्हदेव यावले यास शिवीगाळी,दमदाटी करुन लोखंडी गजाने माझ्या डोकीत मारुन गंभीर जखमी केले आहे.व डाव्या हात्याच्या पोटरीवर मनगटाजवळ लोखंडी गजाने मारुन डाव्या हाताचे हाड मोडले अशा आशयाची फिर्याद पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.