लग्नाचे अमिष आणि काही काळ तर लग्नच झाले आहे,असे सांगून तरूणीवर बलात्कार करणाऱ्या पोलिसाला लोणीकंद पोलिसांनी अटक केली.त्याला 12 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस.जे. डोलारे यांनी दिला.संदीप बळीराम वाघमारे (वय 29, रा. वरळी पोलीस मुख्यालय, मूळ. रावण कोळा, ता. जळकोट, जि. लातुर) असे पोलीस कोठडी झालेल्या पोलिसाचे नाव आहे. याबाबत 27 वर्षीय तरूणीने पोलिसात फिर्याद दिली आहे.
4 जानेवारी 20 मे 2021 या कालावधीत ही घटना घडली. 4 जानेवारी ते 17 जुलै 2020 या कालावधीत लग्नाचे अमिष दाखवून, तर त्यानंतर 20 मे 2021 पर्यंत लग्न झाले आहे, असे सांग़ून त्याने शारीरिक संबंध प्रस्थापित केले.त्यानंतर तिच्या आई-वडिलांकडून अडीच लाख रुपये रोख आणि अडीच तोळे सोने घेऊन फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या प्रकरणात पोलिसांनी वाघमारे याला न्यायालयात हजर केले. त्यावेळी वैद्यकीय तपासणी करण्यासाठी, तसेच वाघोली, कांजुरमार्ग, लातुर, पनवेल या ठिकाणी तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले आहेत. तेथे जावून तपास करण्यासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील ज्ञानेश्वर मोरे यांनी केली.
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…