कर्मयोगी पॉलिटेक्निक कॉलेज शेळवे येथे इ.१० वी नंतरच्या डिप्लोमा इंजिनिअरिंग कोर्स” च्या प्रवेश प्रक्रियेला उत्स्फुर्त सुरुवात
शेळवे (ता.पंढरपूर) येथील कर्मयोगी पॉलिटेक्निक कॉलेज मध्ये प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेसाठी फॅसिलेटेशन सेंटर (एफ.सी.) क्र.६४४७ ला मान्यता मिळाली असून बुधवार (दि.३० जून २०२१) पासून ऑनलाइन प्रवेश अर्ज भरणे, कागदपत्रे पडताळणी व अर्ज निश्चित आदि प्रक्रिया सुरू झाली असून ही प्रक्रिया शुक्रवार, दि.२३ जुलै २०२१ पर्यत चालणार आहे. या वर्षी प्रथमच दहावीच्या निकलापूर्वीच प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. विद्यार्थ्याचा फक्त दहावीच्या परीक्षेचा आसन क्रमांक टाकून प्रवेश अर्ज भरता येणार आहे.दहावी परीक्षेच्या आसन क्रमांकासाठी विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असलेल्या हायस्कूलशी संपर्क साधावा. या प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना जन्म प्रमाणपत्र किंवा रहिवाशी दाखला आवश्यक आहे. अशी माहिती प्राचार्य डॉ. ए.बी.कणसे यांनी दिली.
डिप्लोमा इंजिनिअरिंग सन २०२१-२२ करिता प्रवेशासाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन करणे, भरलेले अर्ज स्विकारून प्रमाणपत्रे, कागदपत्रांची तपासणी, छाननी व नोंदणी आदि प्रक्रिया करण्याकरिता मुंबई येथील मा. संचालक, तंत्र शिक्षण संचालनालय , महाराष्ट्र राज्य (डी.टी.ई) यांनी अधिकृत केंद्र (एफ.सी.क्र-६४४७) म्हणून कर्मयोगी पॉलिटेक्निकला मान्यता दिली आहे. पंढरपूर पंचक्रोशीतील व ग्रामीण भागातील विद्यार्थी व पालक यांच्यासाठी प्रथम वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंग च्या प्रवेश प्रक्रियेचे मार्गदर्शन , पालकांचा होणारा संभ्रम, सबधित कागदपत्रे मिळवताना होणा-या अडचणी व शंका याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी सुविधा केंद्र सुरू केले असून या वर्षी कर्मयोगी पॉलिटेक्निकचे हे १४ वे वर्ष असून या कॉलेजने उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. ही प्रक्रिया दि.३० जून २०२१ पासून ते दि.२३ जुलै २०२१ (सायं ५.००) पर्यंत चालणार आहे. याचा लाभ दहावी मधून उत्तीर्ण होणारे विद्यार्थ्यानी घ्यावा असे आवाहन देखील केले आहे. दरम्यान या कलावधीत प्रमाणपत्राची पडताळणी, छाननी व नोंदणी आदि प्रक्रियेनंतर मुख्य कॅप राऊंडसाठी ऑप्शन फॉर्म भरण्याची ऑनलाइन प्रक्रिया चालू होणार आहे. डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेशासंबधी आधिक माहितीसाठी प्रा.पंढरपूरकर एस.एस.-९१४६५९७८२० व प्रा.कोरबू आय.जे.-८८८८४८९२३५ यांचेशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
कॉलेजचे चेअरमन मा.श्री. रोहन परिचारक(मालक) सो. यांच्या मार्गदर्शनाखाली व प्राचार्य डॉ.ए.बी.कणसे सो. व रजिस्ट्रार- वाळके सो. यांच्या नेतृत्वाखाली उच्च शिक्षित प्राध्यापकांच्या सहकार्याने सर्वोत्कृष्ट निकाल, आदरयुक्त शिस्त आणि करीअरच्या दृष्टीने सर्वोत्तम संस्कार देण्याची परंपरा कायम राखल्यामुळे कर्मयोगी पॉलिटेक्निकचा दबदबा कायम. शै.वर्ष.२०२१-२२ च्या पॉलिटेक्निक प्रवेशासाठी मध्ये फॅसिलेटेशन सेंटर मध्ये सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे दिसून येत आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…