पोलीस आणि नक्षलवादी यांच्यातील संघर्ष गडचिरोली जिल्ह्यासाठी काही नवीन नाही. मात्र रविवार मध्यरात्रीच्या सुमारास जे घडलं त्यामुळे खळबळ उडाली आहे. गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यांतील धोडराज पोलीस मदत केंद्रांत कार्यरत असलेल्या एका पोलीस हवालदाराच्या घरात घुसून काही अज्ञात इसमांनी त्यांच्यावर हल्ला करत त्यांची हत्या केली आहे.
पोलीस हवालदार जगनाथ सिडाम (वय 53) असं मृत हवालदाराचं नाव आहे. यांची राहत्या घरात अज्ञात इसमाने धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केल्याची घटना नागेपली येथील वार्ड नं.२ मध्ये रात्रीच्या सुमारास घडली आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास पोलीस हवालदार जगनाथ सिडाम हे नागेपली इथल्या आपल्या राहत्या घरी झोपले असताना अज्ञात मारेकरूने त्याचा घरांचा दरवाजा ठोठावला. जगनाथ यांनी दरवाजा उघडताच मारेकऱ्यांनी धारदार चाकूनं त्यांच्या गळ्यावर सपासप वार केले. यात ते गंभीर जखमी झाले.
शेजाऱ्यांना घटनेची माहिती मिळताच शेजाऱ्यांनी त्यांना तत्काळ चंद्रपूर येते उपचारांसाठी नेलं असता डॉक्टरांनी त्याना मृत घोषित केलं. मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली पोलिसांनी शोध सुरु केला आहे. मात्र पोलिसांवरच हल्ला करण्याइतकी गुन्हेगारांची हिम्मत वाढली आहे हे या घटनेनं उघड झालं आहे.
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…