पंढरपूर शहरातील भाजपाशी संबंधित असलेल्या एका बड्या नेत्याशी संबंधित शिक्षण संस्थेत उच्चं शिक्षीत असलेल्या कर्मचाऱ्यांनाच महिन्याकाठी लाखो रुपयाचा गंडा घातला जात असल्याच्या तक्रारीची दखल टाइम्स ऑफ इंडियामध्ये फायनान्शिअल एडिटर राहिलेल्या व १९९२ मध्ये हर्षद मेहता शेअर घोटाळा उघडकीस आणलेल्या व नुकतेच अदानी उद्योग समूहाच्या चौकशी बाबतची माहिती ट्विट केल्यानंतर ज्यांच्यामुळे अदानी समूहाला हजारो कोटी रुपयांचा फटका सहन करावा लागला होता. त्या ख्यातनाम पत्रकार सुचेता दलाल यांनी अभियांत्रीकी कॉलेज मधील प्राध्यापकांच्या पगारातून ३० टक्के रक्कम परत घेतली जात असल्याच्या तक्रारीची दखल घेतली आहे.
त्यांनी याबाबत ट्विट करत संस्थेत कर्मचाऱ्यांना पगार दिल्यानंतर रोख स्वरूपात ३० टक्के पगार परत करण्यास भाग पाडले जात असल्याच्या तक्रारीची दखल घेऊन कारवाई करणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे.तर राज्याच्या विनाअनुदानित व खाजगी शिक्षण संस्थांसाठी असलेल्या शुल्क नियामक प्राधिकरणाचे अपर सचिव यांनी उच्चं तंत्रशिक्षण विभागाच्या संचालकास पत्र लिहून सदर विठ्ठल एज्युकेशन आणि रिसर्च इन्स्टिट्यूट या संस्थेमध्ये कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत करण्यात आलेल्या तक्रारीबाबत पुढील कार्यवाही करण्यास सांगितले आहे.
सदर प्राप्त तक्रारीत नमूद केल्यानुसार सिसिटीव्ह फुटेज सह आणखी बरीच चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. हर्षद मेहता घोटाळा उघडकीस आणलेल्या,अदाणी समूहामध्ये झालेल्या गुतवणुकीबाबत सुरु असलेल्या चौकशीचा प्रकार उघडकीस आणून गेल्या महिन्यात देशभरात खळबळ उडवून दिलेल्या धाडसी महिला पत्रकार सुचेता दलाल यांनी पंढरपुरातील या प्रकाराबाबत ट्विट करताना महाराष्ट्रातील खाजगी अभियांत्रिकी शिक्षण संस्थांमध्ये ३० टक्के पगार परत मागितला जाणे धक्कादायक असून संपूर्ण पगाराच्या रकमेचा इन्कम टॅक्स भरणाऱ्या प्राध्यपकांना dte आणि aicte या न्याय मिळवून देण्यासाठी मदत करणार का असा प्रश्न ट्विटरवर उपस्थित केला आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…