गुन्हे विश्व

तलवार हातात घेऊन वाहनांची तोडफोड करणाऱ्याला अटक

हातात तलावर घेऊन दहशत पसरवत वाहनांची तोडफोड करणाऱ्या भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. नवनाथ विठठल घाडगे (वय 24, रा. आंबेगाव पठार) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

भारती विद्यापीठ पोलिसांच्या तपास पथकाचे अधिकारी नितीन शिंदे आणि कर्मचारी हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी चिंतामणी ज्ञानपीठ चौकात हातामध्ये तलवार घेवून एकजण फिरत असल्याची माहिती पोलीस अंमलदार हर्षल शिंदे, गणेश शेंडे व विक्रम सावंत यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून नवनाथ घाडगे याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने 26 जूनला आंबेगाव पठार येथे रस्त्यावरील दगड घेऊन चारचाकी गाडीच्या काचा फोडून गाडीचे नुकसान केल्याची कबुली दिली.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त सागर पाटील, सहायक आयुक्त सुषमा चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, पोलीस निरीक्षक संगिता यादव, प्रकाश पासलकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे, अंमलदार रविन्द्र भोसले, रविंद्र चिप्पा, सर्फराज देशमुख, सचिन पवार, हर्षल शिंदे, गणेश शेंडे, राहूल तांबे, विक्रम सावंत, आशिष गायकवाड व सचिन गाडे यांनी केली.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

3 days ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

5 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

3 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

3 weeks ago