शिक्षकाच्या कार्याचा सन्मान: मिळाली 1 लाखाची स्कॉलरशिप
व्होडाफोन आयडिया ही कम्युनिकेशन क्षेत्रातील नामांकित कंपनी शिक्षणक्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना 1 लाख रुपयांची स्कॉलरशिप प्रदान करते.
शिक्षणक्षेत्रात शिक्षकांचे महत्व अनन्य साधारण आहे त्यामुळे त्यांच्या कार्याचा यथोचित सन्मान व्हावा व ते प्रेरित व्हावेत व त्याच्या माध्यमातून उत्कृष्ट विद्यार्थी घडावेत यासाठी व्होडाफोन आयडिया फाऊंडेशन त्यांच्या CSR फंडातून शिक्षकांना 1 लाख रुपयांची स्कॉलरशिप देते यासाठी या वर्षी पूर्ण देशभरातून 200 शिक्षकांची निवड करण्यात आली. यामध्ये रयत शिक्षण संस्थेच्या भाळवणी शाखेतील श्री प्रशांत पंडितराव कोळसे सर यांची निवड झाली त्यांना स्कॉलरशिप चे रु 1 लाख प्रदान करण्यात आले.
श्री प्रशांत पंडितराव कोळसे हे महाराष्ट्र राज्य अभ्यासक्रम मंडळावर विज्ञान विषयाचे सदस्य असून ते विज्ञान विषयाचे राज्यस्तरीय मार्गदर्शक ही आहेत. ते बालभारतीच्या अभ्यासगटा चे सदस्य असल्याने त्यांनी 6 वी ते 12 च्या पाठ्यपुस्तकात भौतिकशास्त्र विषयांचे लेखन ही केले आहे.NCF, SCF, आंतरराष्ट्रीय शाळा साहित्य निर्मिती, स्वाध्याय निर्मिती, दीक्षा अँप साहित्य मूल्यांकन, नाविन्यपूर्ण विज्ञान केंद्र मूल्यांकन, ई साहित्य निर्मिती व मूल्यांकन, शाळासिद्धी आशा अनेक राज्यस्तरीय समित्यांमध्ये काम केले आहे. त्यांचे आजपर्यंत 5 शोधनिबंध प्रसिद्ध झाले असून त्यांनी शासनाच्या शिक्षणसंक्रमण, किशोर व जीवनशिक्षण या मासिकांसाठी लेखन ही केले आहे त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा विचार करून रयत शिक्षण संस्थेने त्यांना आदर्श विज्ञान शिक्षक, निष्ठावान रयत सेवक या पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. आणि आज व्होडाफोन आयडिया ची 1 लाखाची स्कॉलरशिप त्यांना मिळाल्याने त्यांच्या कार्याचा यथोचित सन्मान झाला आहे.