पंढरपूर, प्रतिनिधी
सोलापूर शहर व जिल्हा स्पोर्टस एरोबीक्स व फिटनेस असोसिएशन व महाराष्ट्र स्पोर्टस एरोबीक्स व फिटनेस असोसिएशनच्या मान्यतेने दि. 22 जुन ते 25 जुन रोजी पं ढरपूरमध्ये पंतनगर फिटनेस सेंटरमध्ये राज्यस्तरीय फिटनेस एरोबीक्स शिबीर पार पडले. फिटनेस एरोबीक्स म्हणजे संगिताच्या तालावर तालबध्द नियमानुसार केलेला व्यायाम प्रकार आहे. सदर खेळ हा चार प्रकारामध्ये शिकवला जातो. स्पोर्टस एरोबीक्स, फिटनेस एरोबीक्स, स्टेप एरोबीक्स, हिप हॉप एरोबीक्स या चार प्रकारात शिकवला जातो. एरोबीक्स हा खेळ जागतीक पातळीवर खेळ म्हणून 1996 पासून खेळला जातो. एरोबीक्स हा खेळ भारतात सन 2001 पासून राष्ट्रीय महासंघाकडून सुरू करण्यात आला आहे.
एरोबीक्स खेळामुळे शरीराचे वजन कमी होते. शारीराला ऑक्सिजनचा पुरवठा नियमीत होतो. ह्रदयाची स्पंदने व्यवस्थीत होतात. एरोबीक्स खेळामुळे सर्व आजारापासून सुटका होते. सदर खेळाला भारतात सी.बी.एस.ई. बोर्डाला व महाराष्ट्र राज्य बोर्डाला शालेय महासंघाची मान्यता असून एरोबीक्स खेळाडुंना सर्व शासनाच्या सवलतीचा लाभ मिळतो. सदर राज्यस्तरीय शिबीरास राष्ट्रीय एरोबीक्स संघटनेचे सचिव संतोष खैरनार यांचे मार्गदर्शन लाभले. सदर राज्यस्तरीय शिबीर आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक सुरैय्या खैरनार यांच्या सखोल व तांत्रिक मार्गदर्शनाखाली पार पडले. सदर राज्यस्तरीय शिबीरात सोलापूर जिल्ह्यातून बावन्न कोचेसने सहभाग घेतला होता. सदर राज्यस्तरीय शिबीरात एरोबीक्स कोच म्हणून विशाल दळवी, संग्राम गायकवाड यांनी यश प्राप्त केले. जिल्हा संघटनेचे मार्गदर्शन उमेश परिचारक यांनी त्यांना सोलापूर जिल्ह्यामध्ये एरोबीक्स खेळाचा प्रसार करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. जिल्हा संघटनेच्या अध्यक्षा चित्रा गायकवाड, जिल्हा संघटनेचे सचिव सुधाकर गायकवाड यांनी यशस्वी खेळाडुंचे अभिनंदन केले.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…