ताज्याघडामोडी

मतदारयादीत रंगीत छायाचित्र नसल्यास नावे वगळणार

ज्या मतदारांची रंगीत छायाचित्रे मतदारयादीत नाहीत, अशा मतदारांची नावे मतदारयादीतून वगळण्यात येणार आहेत. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे आता मतदारांना मतदारयादीत आपले छायाचित्र रंगीत आहे किंवा कसे, याची पडताळणी करावी लागणार आहे.

निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार सध्या मतदारयादीमधील छायाचित्रांची पडताळणी सुरू आहे. यामध्ये ज्या मतदारांचे छायाचित्रे मतदारयादीत नाहीत, त्यांची छायाचित्रे जमा केली जात आहेत. त्याचबरोबर रंगीत छायाचित्र नसेल, तर संबंधित मतदाराचे नाव मतदारयादीतून वगळले जाणार आहे.

पुणे जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघांमध्ये सध्या मतदारयादीतील छायाचित्र पडताळणी आणि नव्याने छायाचित्र जमा करण्याची मोहीम सध्या सुरू झाली आहे.

आजपासून आठ दिवसांच्या आत ज्या मतदारांच्या मतदारयादीमध्ये छायाचित्र नसेल, अशा मतदारांनी आपल्या दोन पासपोर्ट रंगीत छायाचित्रांसह आधार कार्डची छायांकित प्रत, वीज देयकाची छायांकित प्रत तहसील कार्यालय किंवा संबंधित विधानसभा मतदारसंघाच्या मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयामध्ये जमा करण्यास सांगितले आहे.

यादीत नाव असूनही छायाचित्र नसणे, पूर्ण माहिती नसणे, तसेच पत्ता अद्ययावत करणे आदींबाबत कागदपत्रे कार्यालयात जमा करावीत किंवा निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज नमुना क्र. 8 भरावेत. ज्या मतदारांची छायाचित्रे आठ दिवसांत जमा होणार नाहीत, ऑनलाइन अर्ज नमुना क्र.8 मध्ये प्राप्त होणार नाहीत, अशा मतदारांची नावे मतदारयादीतून वगळण्याबाबत पुढील योग्य ती कार्यवाही केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

7 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago