अमरावती : धक्कादायक घटना. जीवापाड प्रेम करणाऱ्या प्रेयसीने दुसऱ्या मुलासोबत साखरपुडा केल्यामुळे प्रियकराने एका झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना येथील रहाटगाव जवळ एका शेतात घडली. या तरुणाने आत्महत्या पूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, चिठ्ठी लिहिण्याबरोबरच आत्महत्या करत असल्याचा व्हिडिओ सुद्धा बनवून त्याने सोशल मीडियावर व्हायरल केला.
अनुभव धाकडे (33, राहणार रमाबाई आंबेडकरनगर अमरावती) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. अनुभव धाकडे याचे परिसरातील एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. तो गेल्या चार ते पाच वर्षांपासून तिला ओळख होता.तेव्हापासून नेहमी हे दोघे रहाटगावनजीक असलेला शेतात भेटत होते. त्यांनी एकमेकांनना लग्नाचे वचनही दिले होते. ते लग्न सुद्धा करणार होते. मात्र अचानक आपल्या प्रेयसीनी साखरपुडा केल्याची माहिती या युवकाला समजल्याने तो दु:खी झाला. त्यानंतर त्याने ज्याठिकाणी झाडाखाली ते रोज भेटायचे त्याच ठिकाणी त्याने झाडाला गळफास लावून आत्महत्या केली आणि आपली जीवनयात्रा कायमची संपवली. त्याने आत्महत्या पूर्वी माझ्या आत्महत्येला माझी प्रेयसी जबाबदार असल्याचे म्हटले आहे.
ज्या झाडाखाली भेटायचे त्याच झाडाला घेतली फाशी
अनुभव आणि त्याची मैत्रिण रोज ज्या ठिकाणी झाडाखाली भेटायची त्याच झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. आत्महत्या करण्यापूर्वी अनुभवने चिठ्ठी सुद्धा लिहून ठेवली असून तसेच आत्महत्या करत असल्याचा व्हिडिओ सुद्धा बनवून त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.
आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठीत काय लिहिले…
त्या रात्री माझ्या घरचे झोपल्यानंतर तू मला येऊन भेटली. तेव्हा तू मला घट्ट मिठी मारून रडत होतीस. तेव्हा मी तुला सोडून समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होतो. परंतु तरीही तू समजत नव्हती. तुझा साखरपुडा होण्याच्या आधी मी तुझ्या पप्पांना फोन करून सर्व सांगितले होते. परंतु तुझे पप्पा तुला फाशी द्यायची धमकी देऊन तुझा विचार बदलला. त्यानंतर माझ्यावर बलात्काराची केस करणार होते. परंतु तू फक्त माझ्या पैशाचा आणि माझ्या मनाचा वापर केला. मला न्याय हवा. मला मुलीची बदनामी नाही करायची बस…
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…