पंढरपूर शहरातील भक्तिमार्ग येथे छोट्या स्वरूपातील किराणा दुकान चालविणाऱ्या वृद्ध महिलेस दुकानात एकटी असल्याचे पाहून दोन भामट्यानी पोलीस असल्याची बतावणी करीत लुबाडले असल्याची घटना घडली आहे.या घटनेमुळे भक्ती मार्ग परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
या बाबत दाखल फिर्यादीनुसार पंढरपुर शहरातील भक्तिमार्ग विस्थापित नगर येथील जनकल्याण हाँस्पीटलच्या समोरील बाजूस कालीका नावाचे किराणा व जनरल स्टोअर्स चे दुकान असुन या ठिकाणी सदर वृद्ध महिला या बसल्या असताना दिनांक 29/06/2021 रोजी सकाळी ठीक १०:३० च्या आसपास सदर वृद्ध महिला या दुकानात एकट्याच असल्याची संधी साधत एक 40 ते 42वर्षाचा काऴा सावऴा वर्णनाचा त्याने चौकडा फुल बाहीचा शर्ट व इशर्ट केलेला अनोऴखी इसम त्या ठिकाणी आला.पोलीस आहे असे बोलुन त्याचे कसले तरी ओऴखपञ दाखवले मी ते व्यवस्थित पाहीले नाही नंतर मला तो म्हणाला की आमचे पोलीस अधिकारी दुकाने चेक करणार आहेत तुम्ही सोने जास्त घातले आहे ते काढुन ठेवा नाहीतर ते सोने जास्त आहेत म्हणुन तुम्हाला दंड करतील असे सांगत विश्वास संपादन केला.सदर वृद्ध महिलेकडील दोन्ही सोन्याच्या बांगड्या काढून त्या पिशवीत ठेवल्या त्याच वेळी आणखी एक इसम त्या ठिकाणी आला या दोघांनी मिळून पिशवीस गाठ मारुन परत पिशवी सदर महिलेकडे दिली व ते दोघे तेथुन निघुन गेले नंतर पिशवीत ठेवलेल्या बांगड्या तपासल्या असता त्यात सोन्याच्या बांगड्या ऐवजी काचेच्या बांगड्या दिसून आल्या.
सदर प्रकरणी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात दोन अज्ञात व्यक्तिच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहॆ .