ताज्याघडामोडी

कृष्णा नदीत एकाच घरातील चार भावंडे बुडाले

धुणे धुण्यासाठी नदीवर गेलेले चौघे भावंडे कृष्णा नदीत बुडाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. नदीवर धुणे धुवत असताना मधला भाऊ तोल जाऊन नदीच्या पाण्यात बुडू लागल्यानंतर त्याला वाचवण्यासाठी पोहायला येत नसताना तीन भावांनी नदीत उडी घेतली, यामध्ये चौघेही बुडाले. पोहायला येत नसतानाही भावाला वाचवण्यासाठी नदीत उडी तीन्हीं भावडांनी उडी घेतल्याने बंधूप्रेम पहायला मिळाले. मात्र चाैघेही बुडाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

अथणी तालुक्यातील हल्याळ गावात गुरुवारी उरुस असल्याने त्यानिमित्त ग्रामस्थ घरातील कपडे आणि बिछाने धुण्यास जात आहेत. कृष्णा नदीवर अंथरुण धूत असताना चार भावंडापैकी मधला भाऊ सदाशिव बनसोडे (वय -24) याचा पाय घसरून तो पाण्यात बुडाला. त्याला वाचवण्यासाठी मोठे भाऊ परशराम यांनी नदीत उडी घेतली, पण तेही बुडाले. त्या दोघांना वाचवण्यासाठी दयाप्पा बनसोडे (वय- 22) याने नदीत उडी घेऊन दोघांना शोधण्याचा प्रयत्न केला. पण तोही बुडाला. त्यानंतर कनिष्ठ भाऊ शंकर बनसोडे (वय- 18) यानेही नदीत उडी घेतली. पण त्यालाही पोहता येत नव्हते. त्यामुळे तोही बुडाला. परिणामी बुडालेले चौघेही भाऊ घटनास्थळापासून लांब वाहत गेले असण्याची शक्यता आहे.

घटनेची माहिती बनसोडे कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर घटनेची माहिती अथणी पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळी डीवायएसपी एस. व्ही. गिरीश, सीपीआय शंकरगौडा बसगौडर, पीएसआय कुमार हडकर, तहसीलदार दुंडाप्पा कोमर यांनी धाव घेतली. नदीकाठी तालुका प्रशासन ठाण मांडून आहे. वाहून गेलेल्यांपैकी दोघे विवाहित आहेत. दोघे अविवाहित आहेत. त्यांच्या मागे आई-वडील, दोन भावांच्या पत्नी, तीन मुले, तीन मुली आहेत.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

35 minutes ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago