देहू, आळंदी : अवघ्या महाराष्ट्राचा धार्मिक सोहळा अर्थात आषाढी वारी सोहळा येत्या 1 जुलैला जगतगुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थानाने सुरू होतोय…! पण यंदा ही कोरोनामुळे हा सोहळा मर्यादित वारकऱ्यांच्या उपस्थित होणार आहे. भागवतांच्या संभाव्य गर्दीमुळे पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालायकडून देहू आणि आळंदीमध्ये संचारबंदी लागू करण्यात आलीये.
त्याच पार्श्वभूमीवर आता पोलिसांनी 28 जून ते 4 जुलै पर्यंत देहू आणि आसपासच्या 6 गावांमध्ये संचारबंदी लागू केलीये. त्यात स्थानिक देहूकरांना ओळखपत्र दाखवूनच गावात प्रवेश देण्यात येणार आहे. देहूरोड पोलिसांकडून याची अंमलबजावणी देखील सुरू झाली आहे.
बॅरिकेट्स लावून पोलिसांनी मंदिर परिसर बंद केला आहे, त्यामुळे संपूर्ण देहूनगरीला छावणीचं स्वरूप प्राप्त झालंय.
कोरोनाच्या वाढता प्रसार पाहता गर्दी टाळण्यासाठी जमेल तितके कठोर निर्बंध स्थानिक प्रशासनाकडून लावण्यात येत असल्याचं दिसून येतंय. सरकारने दिलेल्या नियमावलीचे काटेकोर पालन केलं जावं याची स्थानिक पातळीवर देखील खबरदारी घेतली जात आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असतानाच आता डेल्टा आणि डेल्टा प्लस या कोरोना विषाणूने सर्वांची चिंता वाढवली आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…