गुन्हे विश्व

झोपलेल्या दाम्पत्याची डोक्यात फावडे घालून निर्घृण हत्या

शिर्डी जवळील को-हाळे शिवारात चांगलेमळा येथील दांम्पत्याच्या हत्येने परिसरात एकच खळबळ उडाली. रात्रीच्या सुमारास दांम्पत्य गाढ झोपेत असताना फावडे डोक्यात घालून दोघांची निर्घृण हत्या करण्यात आल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. शशिकांत चांगले ( वय 55 ) आणि सिंधू चांगले ( वय 50 ) असे हत्या झालेल्या पती – पत्नीच नाव आहे.

शशिकांत आणि सिंधु चांगले हे दाम्पत्य आपल्या शेतावरील घरात दोघेच राहात होते. त्यांची मुले राहाता येथे वास्तव्यास आहेत. उकाडयामुळे घराचा एक दरवाजा उघडा ठेवून हे दांम्पत्य झोपले होते. रात्रीच्या सुमारास दोघेही गाढ झोपेत असताना त्यांची फावडे डोक्यात घालून हत्या केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालय.

घरात कसलीही चोरी झाली नसल्याने यामागे हत्येचाच इरादा होता हे प्रथमदर्शनी स्पष्ट होत आहे. दरम्यान श्वानपथक , फॉरेन्सिक टिमला बोलवण्यात आले होते. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहे.

घटनेची माहीती मिळताच‌ राहाता पोलीस स्टेशनचे पोलिस निरिक्षक सुभाष भोये हे आपल्या फौजफाटयासह घटनास्थळी पोहोचले. घटनेचा पंचनामा करत आरोपींच्या शोधार्थ पोलिसांनी श्वानपथकाद्वारे माग काढण्याचा‌ प्रयत्न केला. घटना स्थळापासुन एक किलोमीटर अंतरापर्यंत श्वानाने ‌माग शोधला मात्र तो तेथुन पुन्हा घटनास्थळी पोहोचला. फॉरेंन्सिक टिमने पुरावे शोधले आहेत. मात्र पोलिसांनी ते उघड केलेले नाहीत. दरम्यान पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. लवकरच आरोपी जेरबंद होईल असा विश्वास अतिरिक्त पोलिस अधीक्षक दिपाली काळे यांनी प्रसामाध्यमांना सांगितले.

अतिरिक्त पोलिस अधीक्षक दिपाली काळे , शिर्डीचे विभागीय पोलिस अधिकारी सावंत , पो.नि सुभाष भोये हे घटनेचा तपास करत असुन हि घटना पुर्व वैमन्यासातुन की जमिनीच्या वादातुन घडली याचा तपास करत आहेत. या घटनेची वार्ता गावात कळताच ग्रामस्थांनी चांगले यांच्या मळ्यात‌ मोठी गर्दी केली होती. या हत्येचा तपास लवकरात लवकर करावा अशी मागणी को-हाळे ग्रामस्थांनी केली आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी एसक्यूएल प्रशिक्षण; ७५ हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…

5 days ago

साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला वेग; डॉ. श्रुती जोशी यांच्या नेतृत्वाखाली सदिच्छा भेटींचा धडाका!

शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…

1 week ago

शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांचा निर्धार; प्राध्यापकांचे रोजगारहित आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य

NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…

1 week ago

विजयादशमीच्या मुहूर्तावर साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात!

गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर   सातारा : पुणे विभाग…

2 weeks ago

सांगोला तालुक्यात डॉ.बी.पी. रोंगे सरांचा दबदबा

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…

2 weeks ago

सांगली जिल्ह्यात ज्ञानयात्री डॉ.बी.पी. रोंगे सरांना उत्स्फूर्त प्रतिसाद

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर १०० टक्के विजयी होणार मिरज – राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक…

2 weeks ago